अडेगाव येथील महिला व तरुणावर गुन्हा दाखल,दुचाकी सह २५ हजार २०० चा मुद्देमाल जप्त

  • Post author:
  • Post category:वणी

नितेश ताजणे, झरी:–मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अडेगाव येथे लपून छपून दारूची विक्री काही तरुण व दोन महिला करीत असल्याची माहिती ठाणेदार अजित जाधव यांना लागली यावरून ठाणेदार यांनी दारूविक्री करणाऱ्या अडेगाव येथील काही तरुण व दोन महिलांना दारू व दुचाकीसह पकडून गुन्हे दाखल करून कार्यवाही केली. परंतु सदर दारू विक्रेते मुकुटबन येथे येऊन दारू दुकानातुन दारूच्या पेट्या रात्री घेऊन जात होते. व दारूची विक्री करीत होते. अश्यातच अडेगाव येथील महिला अनिता विठ्ठल मलवडे वय ३६ वर्ष ही विकास नरेंद्र साखरकर वय २० वर्ष याच्या सोबत दुचाकी क्र. MH 29 AP 1535 वर बसून मुकुटबन येथील एका परवाना धारक देशी दारूच्या दुकानातून १८० मिली चे ८० शिष्या किंमत ५ हजार २०० चा माल पांढऱ्या कलरच्या नायलॉनच्या पिशवीत घेऊन जात असल्याची माहिती २४ फेब्रुवारीला रात्री ९ वाजता दरम्यान पोलिसांना मिळाली. यावरून पोलीस उपनिरीक्षक अनिल सकवान संजय खांडेकर मोहन कुडमेथे व स्मिता असडे यांनी आरसीसीपीएल कंपनीच्या रोड जवळ सापळा रचला व पाळत बसले. काही वेळातच दुचाकीने विकास साखरकर आला असता त्याला थांबविले असता दुचाकीच्या मागे बसलेल्या अनिता मलवडे हातातील पिशवीची तपासणी केली असता त्यात दारूच्या शिष्या आढळून आल्या. दुचाकीसह दोघांनाही पोलीस स्टेशनला आणले व त्यांच्या जवळील ८० दारूच्या शिष्या किंमत ५२०० व दुचाकी किंमत २० हजार असा एकूण २५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी दोघांविरुद्ध कलम ६५(ई) अंतर्गत गुन्हा नोंद केला, असुन पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मोहन कुडमेथे व संतोष मडावी करीत आहे.