प्रशासनाचे दुर्लक्ष भारत निर्माण योजने अंतर्गत बांधण्यात आलेली पाण्याची टाकी शोभेची वस्तू

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुक्यातील करंजी ( सो ) या ठिकाणी भारत निर्माण योजने अंतर्गत बांधण्यात आलेली पाण्याची टाकी शोभेची वस्तू बनली आहे.
मात्र याकडे पाणीपुरवठा विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांन मध्ये रोष पसरला आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेता सन २००६ मध्ये भारत निर्माण पाणीपुरवठा योजनेची निर्मिती करण्यात आली परंतु आजरोजी या पाणीपुरवठा टाकीचा कुठलाही फायदा गावकऱ्यांना होत नसून पाण्याची टाकी अनेक वर्षा पासून फक्त शोभेची वस्तू बनली.

ग्रामस्थांच्या सुविधे करीता बांधण्यात आलेली पाणीपुरवठा टाकी तब्बल १२ वर्षे होऊन सुद्धा बंदच का ?
बांधकामा पैकी छपाई चे काम अजूनही शिल्लक आहे. टाकी मध्ये पाणी ये-जा करणाऱ्या पाईप लाईन ची दिशा भूल झाली असून पाण्याचा मार्ग चुकला आहे.
पाणीपुरवठा विभाग पं.स.राळेगाव यांनी लवकरात लवकर पाहणी करून रखडलेला टाकी व पाईपलाईन चा मार्ग मोकळा करावा अशी मागणी करंजी ( सो ) येथील सरपंच श्री.प्रसाद ठाकरे यांनी केली आहे.