मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राजु उंबरकर यांच्या हस्ते वेबसाईट चे लोकार्पण व पत्रकार बांधवांचा सत्कार

  • Post author:
  • Post category:वणी

वणी : नितेश ताजणे

मराठी भाषा गौरव दिन निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेने द्वारा वणी येथील स्थानिक पत्रकार बांधवांचा सत्कार व मराठी भाषा संवर्धन बहुउद्देशीय संस्था ढाणकी ता. उमरखेड’ या संस्थेच्या वेबसाईट (संकेतस्थळ चे) लोकार्पण सोहळा आयोजीत करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजु उंबरकर होते. तर प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ मार्गदर्शक गोविंद थेरे सर, मनसे वणी तालुका अध्यक्ष फाल्गुण गोहोकार, मनसे वणी शहराध्यक्ष शिवराज पेचे, मनसे रुग्णसेवेचे अज्जु शेख. मराठी भाषा संवर्धन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पेंढरवाड, कार्याध्यक्ष नागोराव कोम्पलवार, उपाध्यक्ष लक्ष्मण काकरवार, कोषाध्यक्ष निशांत कपाट उपस्थित होते.
यावेळी राजु उंबरकर यांचा मराठी भाषा संवर्धन संस्थेकडून शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी “मराठी भाषा संवर्धन संस्थेची”अधिकृत वेबसाईट (संकेतस्थळ)www.mlcmo.org चे लोकार्पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजु उंबरकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जेष्ठ मार्गदर्शक गोविंद थेरे सर यांनी केले तर मराठी भाषा संवर्धन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पेंढरवाड यांनी “मराठी भाषा जतन व संवर्धनाची गरज” यावर विचार व्यक्त केले.
वणी येथील विविध -प्रसार माध्यमांचे पत्रकार,वार्ताहर बंधूंचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देवून राजु उंबरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये दैनिक तरुण भारत चे गजानन कासावार, दै. भास्कर चे सुनिल पाटील, दै. सकाळ चे तुषार अतकरे, पुण्यनगरी चे सागर बोढे, युवाराष्ट्र चे रमेश तांबे. दै. मतदार -चे राजु धावंजेवार, दै. लोकमत चे आसिफ शेख, दै. हिंदुस्थानचे परशुराम पोटे, वणी बहुगुणी चे जितु कोठारी, TV9 चे सौरव परबत,सिटी न्युज चे मुस्ताक शेख,तेलंग, मातृभुमिचे पुरुषोत्तम नवघरे, नवराष्ट्र चे निकेश चौधरी,लोकदुत चे श्रीकांत किटकुले, इत्यादी पत्रकार बंधूंचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नितिन मोवाडे यांनी केले.
कार्यक्रमाला मनसेचे कार्यकर्ते गितेश वैद्य, राजू बोधाडकर, अरविंद राजुरकार, नितिन पारखी, धोटे, अनिकेत येसेकर यांचेसह मनसे कार्यकर्ते व मराठी बांधव उपस्थित होते.