
झरी येथील नगरपंचायत अध्यक्षपद निवडीवरून काँग्रेस व शिवसेनेत प्रचंड चढाओढ सुरू होती. अखेर अध्यक्षपदी शिवसेनेचाच विराजमान झाला. अध्यक्ष निवडीची तारीख निश्चित होताच, शिवसेना व जंगोम दलाचे नगरसेवक महाराष्ट्र दर्शनाकरिता निघाले. तर माजी आमदार वामनराव कासावार यांच्या वाढदिवसानिमित्त अपक्ष नगरसेवकाने काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. तेव्हापासून तसेच काही पुढाऱ्यांच्या “सर्व काही मीच” च्या भूमिकेमुळे शिवसेना व काँग्रेस मध्ये दुरावा निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच शिवसेना व जंगोम दल मिळून सत्ता स्थापण्याचा निर्णय घेतला. व ९ सदस्य घेऊन १४ दिवस दर्शकरिता निघून गेले. व काँग्रेसला सत्तेत न येऊ देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे. युती करीता शिवसेना व कॉंग्रेच्या नेत्यांनी एका ठिकाणी बसून निर्णय घेतला असता तर महाविकास आघाडीचे अध्यक्ष बसला असता अशीही चर्चा सुरू आहे. परंतु दोन्ही पक्षाचा नात न जुळल्याने आघाडीत बिघाडी झाली.
१३ दिवसानंतर म्हणजेच १४ फेब्रुवारीला शिवसेना व जंगोमदलाचे ९ नगरसेवक ११ वाजता नगरपंचायत मध्ये हजर झाले. काँग्रेसने सुद्धा मनसे व बिजेपीचा नगरसेवक घेऊन ८ नगरसेवक केले होते एक नगर सेवक कमी पडल्याने अखेर ९ मताने शिवसेनेची ज्योती बीजगूनवार अध्यक्ष झाल्या तर ९ मते घेऊन जंगोमदलाचे ज्ञानेश्वर कोडापे उपाध्यक्ष झाले. ज्योती बीजगूनवार यांच्या विरुद्ध काँग्रेसच्या सुजाता अनमुलवार होत्या त्याना ८ मते मिळाली, तर उपाध्यक्ष करिता काँग्रेसचे दिनेश जयस्वाल यांनाही ८ मते मिळाली. अध्यक्ष उपाध्यक्षचा निकाल लागताच गुलाल उधळून तसेच फटाके फोडून जल्लोष व आनंद व्यक्त करण्यात आला.
अध्यक्ष व उपाध्यक्ष बसविण्याकरिता शिवसेनेचे माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष चंद्रकांत घूगुल यांच्या चाणक्य बुद्धीमुळे व संजय बीजगूनवार यांच्या आर्थिक मदतीमुळे नगरपंचायतेत सत्ता स्थापन करण्यात यश आले. नगरपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष पदावर विराजमान करण्याकरिता माजी आमदार, तालुका अध्यक्ष सह वणी विधानसभा अध्यक्ष संतोष माहुरे, संदीप विचू, सतीश आदेवार पंचायत समिती सदस्य प्रणिता घुगुल, सतीश आदेवार, विनोद उप्परवार, निकेश बेलेकर, विलास कसोटे, बंडू देवाळकर, वासुदेव देठे, सीताराम पिंगे, शंकर पाचभाई, शेख हसन तर जंगोम दलचे कालिदास अरके,विठल उईके सह इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले…
