
नागपूर महामार्गावरील वरोरा नागपूर मार्गावर भीषण अपघात घडला असून यामध्ये बरेच प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
नागपूर महामार्गावर 5.30 हा अपघात घडला असून महामार्गावरील सर्व रहदारी दोन तास बंद पडली होती. ट्रॅव्हल्स क्रमांक MH40AT481 नागपुर वरून चंद्रपूर ला जात असताना ट्रक क्रमांक MH34 BG 9540 ला धडक दिल्याने हा अपघात घडला. या ट्रॅव्हल्स मध्ये फक्त 45 प्रवासी प्रवास करीत होते. यामधील ट्रॅव्हल्स चालक शेख शब्बीर जलनगर चंद्रपुर, व ट्रक चालक अमोल भुजाडे राहणार चिखलगाव, वनी या दोन्ही चालकांचा घटनास्थळ मृत्यू झाला.हा अपघात कशामुळे घडला याचे नक्की कारण अजून पर्यंत करू शकले नाही मात्र अपघात इतका भीषण होता की ट्रॅव्हल्स आणि ट्रक मधील दोन्ही चालक जागीच मृत्युमुखी पडले. यांना काढण्यासाठी जेसीपी क्रेन चा उपयोग करून या वाहनांना वेगळे करावे लागले. वरोरा येथील प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून बाकीच्या प्रवाशांना उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे तात्काळ हलविण्यात आले. या ठिकाणावरून बऱ्याच रुग्णांना चंद्रपूर व सेवाग्राम वर्धा येथे रेफर करण्यात आले असून चौदा रुग्णांची स्थिती गंभीर आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी, व तालुका प्रशासनाच्या माध्यमातून रुग्णांना हलविण्याचे काम सुरू आहे त्यांच्या बॅग व इतर सामाना पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले असून सामाजिक कार्यकर्ते व वरोरा शहरातील प्रशासकीय यंत्रणा युद्ध स्थळावर काम करत आहे .
या अपघातामध्ये उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे दाखल झालेल्यांची नावे .
हर्षा झाडे ,वनली
सुमित मानकर वनी
प्रवीण घाटे ,वरोरा
प्रणाली नंदकटे, टेमुर्डा
सुरज दाते, मजरा
संतोष गाळगटे ,भद्रावती
रीना बागेसर
भोजराज बागेसर
अनिता परचाके, घुगुस
रुक्मा तुलस ,कोरपना
सविता रांगडे
प्राची झगडे
सरस्वती डाहुले
आवेश अहमद घुगुस
असून काही प्रवासी आपल्या घरी परत गेले आहेत.
