मार्कंडेय पोदार लर्न स्कूल वणी येथे बालक दिन उत्साहात साजरा

  • Post author:
  • Post category:वणी

मार्कण्डेय पोदार लर्न स्कूल वणी मध्ये बालक दीन पंडीत जवाहरलाल नेहरु जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थी आराध्य लखमापूरे अन्यंना सिंग, आमेर खान, रोहीत मेश्राम, सोहम पावडे, चेतन पावडे, नीरजा सेंथील यांनी पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेला हार पुष्प अर्पण केले सोबत स्कूलचे प्राचार्य मान अमीन नुरानी सर यांनी दिप प्रज्वलन करून कार्यक्रमांच्या सुरवातीला सर्व शिक्षक वृंद यांनी दररोज आपली शिस्त बद्ध वातावरणात प्रार्थणा करीत असते परंतु आज विध्यार्थी यांच्या भूमिकेत शिक्षकांनी सुविचार सोनाली ताकसांडे प्रार्थना माया त्रिवेदी सामान्य ज्ञान स्पर्धा विषयी प्रश्न संध्या करमंनकर प्रतिज्ञा श्रेयस कामटकर सोबतच विविध सांस्कृतीक कला सादर केल्या त्यात नृत्य कला मध्ये गुडीया पाठक उल्का काकडे, संतना लक्ष्मी माया त्रिवेदी संध्या करमंनकर प्रियंका दानव शुभांगी देशमुख उज्वला नगराळे अनुश्री देशपांडे ममता त्रिपाठी आशिया शेख सोनाली ताकसांडे यांनी नृत्य सादर केले.

संगीत गायन मध्ये विनीत भोयर गुडिया पाठक शरद तरारे सूरज कडूकर श्रेयस कामटकर मुनाफ शेख गौरव घुले यांनी सहभाग घेतला,
संभाषण कौशल्य विकसित करण्याची दृष्टीने मुख्याध्यापक मान अमिन नुरानी सर यांनी मुलांना पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या जिवनचरित्रावर सविस्तर माहिती तसेच बालक दिनाचे महत्त्व पटवून देत विध्यार्थीना मार्गदर्शन केले त्यानंतर प्रत्येक विद्यार्थी यांना बक्षीस वितरण करण्यात आले कार्यक्रमांची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आलीअखेर खाऊ वाटप करण्यात आले, शैक्षणिक विकास बरोबर सांस्कृतीक कला जोपासण्याची संकलपणा संस्थेनीं आखली, कार्यक्रमाचे संचालन, कनकलता सिंग यांनी केले तर आभार प्रदर्शन गुडिया पाठक यांनी मानले यशस्वितेकरीता शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले,,