
झरी तालुक्यातील धानोरा येथील वृद्ध महिलेचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू झाल्याची घटना घडली.प्राप्त माहिती नुसार ४ ऑक्टोबर रोजी १ वाजता दरम्यान वणी कडून आदीलाबाद कडे जाणारी के.एस. एन. के. नावाच्या मालगाडीने( रेल्वे)धानोरा येथील शौचास गेलेल्या वृद्ध महिलेला धडक दिल्याने सदर महिला जागीच ठार झाली.
मृत महिलेचे नाव रामक्काबाई देवंना पार्लेवार वय ८० वर्ष असून महिला रेल्वेस्थानक जवळ खुली असलेल्या जागेवर सौचास गेली होती परत येतांना अचानक मालगाडी येत असल्याचे दिसल्याने ती घाबरली व रेल्वे रुळाच्या मध्ये पडली व रेल्वेच्या धडकेने दूर फेकल्या गेली व तिच्या डोक्याला जबर मार लागल्याने तिचा मृत्यु झाला. रेल्वे चालकाने अनेकदा हॉर्न वाजविला परंतु घाबरलेल्या महिलेला कळले नसल्याचा अंदाज व्यक्त केलेल्या जात आहे.
रेल्वे अपघातात ठार झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे पोलिसांना देण्यात आले. वरोरा येथून रेल्वे पोलीस धानोरा रेल्वे स्थानकावर पोहचले तसेच पाटण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक ठोमरे व जमादार श्यामसुंदर रायके सुद्धा पोहचले. पोलिसांनी पंचनामा केला . मृतक वयोवृद्ध असल्याने तिचे शवविच्छेदन न करता ग्रामवासी व नातेवाईकांनी प्रेत घेऊन अंत्यसंस्कार केले.
