लग्नाच्या अभिनंदन कार्यक्रमात 25 पेक्ष्या जास्त लोकांची गर्दी,पोलिसांनी नवरदेवसाहित इतर चार लोकांवर मुकुटबंन पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल

प्रतिनिधी:नितेश ताजने,वणी

लग्न समारंभ म्हणजे गर्दी आलीच म्हूणून राज्य सरकारने कडक निर्बध केले असताना राज्य शासणाने 25 लोकांची मर्यादा देऊन फक्त लग्न दोन तासात करा असे आदेश असताना यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथे लग्नाच्या अभिनंदन कार्यक्रमाला चक्क तीनशे ते चारशे लोकांची गर्दी केल्याची माहिती मुकुटबंन पोलिसांना लागली
पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले असतां त्यांना कोरोना शासकीय नियमाचे उल्लंघन केल्याचे दिसून येतात त्यांनी स्थानिक ग्रामपंचायत कर्मचारी,पोलीस पाटील यांना विचारणा केली असता लग्नासाठी कुठलिही परवानगी घेतली नसल्याचे पोलिसांना आढळून आले असतां ग्रामपंचायत अंतर्गत 50000 रुपयांचा दंड असताना ग्रामपंचायत कर्मचारी दंड देण्याकरीत आले असताना याच्यासोबत हुज्जत घातली
शासनाने कोरोना झपाट्याने प्रसार होण्यास लग्नातील गर्दी कारणीभूत असल्याचे लक्ष्यात आल्याने त्यांनी लग्न समारंभावर कडक र्निबध लाभले,या नियमाची पायमली केल्याचे कडताच नवरदेव मंगेश श्रीराम चिचुलकर वय 26 वर्ष,शंकर दादाजी झाडे( जावई)(38)वैभव लक्ष्मन चिचुलकर(22)श्रीराम चिंचुलकर (56) विशाल चिंचोलकर(20)याच्यावर संचारबंदी कलम 188,269,270,37(1) साथीरोग अधिनियम 1897(2)(3)(4)असे बरेचसे गुन्हे फिर्यादी नुसार पोलीस त्या सर्व लोकानवर गुन्हे दाखल करण्यात आले .
पुढील तपास पोलीस निरीक्षक युवराज राठोड ,पोलीस शिपाई जितेश पानघाटे
करत आहे