
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील विहिरगाव येथे क्रांतिवीर शामादादा कोलाम,क्रांतिकारी बिरसा मुंडा, स्व.चंद्रमोहन कोल्हे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जहाल मित्र क्रिडा मंडळ विहिरगाव द्वारा आयोजित भव्य कबड्डी प्रेक्षणीय खुले सामने या खुल्या सामन्याच्या उद्घाटनप्रसंगी दि.१५ जानेवारी रोजी कबड्डी खेळाचे जानकार व अमरावती विद्यापीठाचे लगातार चार वर्ष अजिंक्यपद पटकवणाऱ्या संघाचे भुतपुर्व खेळाडू व किन्ही जवादे ग्रामपंचायतचे सरपंच सुधीरभाऊ जवादे, माजी सभापती प्रविणभाऊ कोकाटे, राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अंकुशभाऊ मुनेश्रर ,सरपंच किशोरभाऊ धामंदे,पुरुषोत्तम चिडे,पांडुरंग भेदुरकर,महेश परचाके यांच्या हस्ते सामन्याचे उद्घाटन करून सामन्याला सुरुवात करण्यात आली आहे. यात सदर प्रथम क्रमांकाचा पुरस्कार २१ हजार तर द्वितीय पुरस्कार १५ हजार तर तृतीय पुरस्कार १० हजार तर चतुर्थ पुरस्कार ७ हजार रुपये ठेवण्यात आला आहे. सदर या भव्य कबड्डी प्रेक्षणीय खुले सामन्याचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष गनेश रामपुरे,उपाध्यक्ष झित्रुजी कोडापे,सचिव निलेश मेटकर,कोषाध्यक्ष अनुमान खंगारे,सहकोषाध्यक्ष रामाजी खंगारे,कर्णधार हरिकांत मेटकर, उपकर्णधार कीरण खंगारे यांनी केले आहे. या उद्घाटनप्रसंगी गावातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
