
जीवनातील संकटे यशाची वाट दाखविते – पत्रकार निता सोनवणे
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त कार्यक्रम
तालुका प्रतिनिधी/२फेब्रुवारी
काटोल – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त जि.प.उच्च प्राथमिक शाळा, थुंगाव (निपाणी) येथे ‘ग्रेट भेट’ उपक्रमांतर्गत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पत्रकार निता सोनवाने यांची मुलाखत घेतली.
यावेळी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतांना पत्रकार निता सोनवाने म्हणाल्या की, आजच्या युगात मुलींनी आत्मनिर्भर असायला हवे.स्वतःची सुरक्षा स्वतः करण्याकरिता मुलींनी सक्षम व्हावे.जीवनात निर्मळ मनाची माणसांसोबत मैत्री करा.ती आयुष्यात निराशेच्या वेळी प्रेरणा म्हणून उभी राहील.जीवनात जेवढी संकटे येईल तेवढे यश मोठे मिळेल.म्हणून संकटाला न घाबरता सामोरे जा.आई-वडील व गुरुजनांचे जीवनात खूप महत्व आहे.त्यांचा नेहमी सन्मान करा.
कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक धनंजय पकडे, संचालन निलेश शहाकार तर आभार प्रदर्शन संदीप बागडे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नुतन गोरे, सलोनी चौधरी, प्रणाली देशमुख, यामिनी हनवते, निकीता हनवते, मोनिका देशमुख, विधी सिरस्कर, रिया चौधरी,मयुरी चौधरी, ईशा देशमुख, अपेक्षा बडोदेकर, चैताली चौधरी, सम्रुद्धी लोहे
आदींनी परिश्रम घेतले.
