
तालुका प्रतिनिधी/२३जुलै
काटोल – जि.प.स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यास केंद्र, काटोल येथे लोकमान्य टिळक जयंती निमित्त गटशिक्षणाधिकारी संतोष सोनटक्के यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला.
मार्गदर्शन म्हणून अमित बांबल तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणसाथी दामिनी निंबूळकर, केंद्र समन्वयक एकनाथ खजुरीया, उपक्रम संयोजक राजेंद्र टेकाडे, मार्गदर्शक कपिल आंबुडारे, शिक्षक उमेश ढोक प्रामुख्याने उपस्थित होते.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात जहाल व मवाळ दोन गट होते.मवाळ गटाला सामाजिक सुधारणा प्रथम तर राजकीय स्वातंत्र्य नंतर विनंती, निवेदन व अर्ज या शांततेच्या मार्गाने मिळेल अशी अपेक्षा होती.
मात्र जहाल गटाचे नेतृत्व करणारे लोकमान्य टिळक यांना प्रथम राजकीय स्वातंत्र्य अभिप्रेत होते.त्यासाठी त्यांनी लोकसंघटन तयार करून लोकजागृती केली व लोकसंघर्ष उभा केला.स्वदेशी, स्वराज्य , राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार या चतु:सूत्रीच्या बळावर देशास्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान दिले.व देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला,असे विचार अमित बांबल यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक संतोष सोनटक्के, संचालन राजेंद्र टेकाडे तर आभार प्रदर्शन स्वाती राठोड यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संगणक ऑपरेटर सतिश बागडे, परिचारिका अनुसया रेवतकर, सुरक्षा रक्षक प्रल्हाद पडोळे यांनी परिश्रम घेतले.
