काटोल तालुक्याचा निकाल 92.55%,काटोल तालुक्यात मुलीच सरस

मागील वर्षीच्या तुलनेत निकाल वाढला

मुले 1026 तर मुली 955 उत्तीर्ण

4 शाळेचा निकाल 100 %

/8 जून
काटोल : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये काटोल तालुक्याचा निकाल 92.48% लागला असून उत्तीर्ण होण्यामध्ये मुलांची संख्या 1026 (91.60 %) तर मुलींची संख्या 955 (93.44%) आहे.

तालुक्यात सर्वात जास्त 100% निकाल नगर परिषद ज्युनिअर कॉलेज,अरविंद इंडो ज्युनिअर कॉलेज , बी.आर.इंग्रजी माध्यम शाळा,तिरुपती इंटरनॅशनल स्कुल यांचा 100 % निकाल आहे.
तालुक्यात नबीरा ज्युनिअर कॉलेज 92.56 %, बी.आर.ज्युनिअर कॉलेज 95.39%,लाखोटीया भुतडा ज्युनिअर कॉलेज,कोंढाळी 89.39%,गोविंदराव उमप ज्युनिअर कॉलेज ,येनवा 96.15%, आदर्श ज्युनिअर कॉलेज,कचारी सावंगा 94.87%, उर्दू ज्युनिअर कॉलेब 87.07
9%,स्व.शामपंत कडू ज्युनिअर कॉलेज,मासोद 84.09%, ग्रामविकास ज्युनिअर कॉलेज,मेटपांजरा 93.04%, स्व.दादासाहेब बारोकर ज्युनिअर कॉलेज,येरला(धोटे) 98.58%, नगर परिषद ज्युनिअर कॉलेज 100%, शासकीय तंत्र कनिष्ठ महाविद्यालय 84.61%, अरविंद इंडो ज्युनिअर कॉलेज निकाल 100%, नगर परिषद कनिष्ठ महाविद्यालय, काटोल 100%, तिरुपती इंटरनॅशनल स्कुल, काटोल 100%,बी.आर.कॉन्व्हेंट, काटोल 100% निकाल लागला.

विषयनिहाय उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे विश्लेषण केल्यास इंग्रजी 96.79%, मराठी 97.96%,इतिहास 97.21%, गणित 99.60%, राज्यशास्त्र 97.65% ,अर्थशास्त्र 96.49%, भौतिकशास्त्र 99.67%, रसायनशास्त्र 99.70% तर जीवशास्त्र विषयाचा निकाल 99.70% लागला आहे.

तालुक्यातील विशेष प्राविण्य श्रेणीत 158 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 542 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत 1014 तर तृतीय श्रेणीत 250 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्याचा विज्ञान शाखेचा निकाल 99.44% , कला शाखा 92.21 %, वाणिज्य शाखा 95.79 %, व्यावसायिक शाखा (MCVC) 94.57% लागलेला आहे.