सलग १२ तास पुस्तक वाचन करून डॉ.कलामांना अभिवादन..

काटोलमध्ये वाचन संस्कृती जनजागृतीचा विक्रम

वाचनातून डॉ.कलमांना अभिवादन

जि.प.स्पर्धा परीक्षा व मार्गदर्शन केंद्र, काटोलचा उपक्रम

तालुका प्रतिनिधी/१४ ऑक्टोबर
काटोल – भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिवस’ म्हणून साजरा करण्यासाठी येतो.
हेच औचित्य साधून जि.प.स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यास केंद्र, काटोल येथील विद्यार्थ्यांनी दि.१४ ऑक्टो ला सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यत सलग १२ तास वाचन करून कृतीद्वारे डॉ.कलमांना अभिवादन केले.
या उपक्रमाबाबत गटशिक्षणाधिकारी संतोष सोनटक्के म्हणाले, वाचन संस्कृती ही काळाची गरज आहे.इंटरनेटच्या युगात विद्यार्थ्यांचे वाचन कमी झाली असल्याची सार्वत्रिक ओरड असतांना आमच्या जि.प.स्पर्धा परीक्षा केंद्रात सलग १२ तास वाचन करून नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.विद्यार्थ्यांच्या सर्वागीण व्यक्तिमत्त्व विकासाकरिता भविष्यातही अभ्यासकेंद्राकडून विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येईल.
काटोल शहरात प्रथमच वाचन संस्कृतीला खतपाणी घालविण्यासाठी राबविलेल्या उपक्रमाबाबत उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी नागेश जाधव, तहसिलदार अजय चरडे, मुख्याधिकारी धनंजय बोरीकर, गटविकास अधिकारी संजय पाटील आदींनी कौतुक केले.
या उपक्रमाकरिता केंद्र समन्वयक एकनाथ खजुरीया, उपक्रम संयोजक राजेंद्र टेकाडे यांनी नियोजन केले तर निखिल देशभ्रतार, राहुल धवड, आदित्य बाभूळकर, गौरव गाढवे, यश जोगेकर, प्रतिक मानेराव, आरती कावडकर, पूजा मारोटकर,गुंजन रिठे, नोमादेवी खुरपडे, स्वर्णा कोटजावळे, धनश्री खसारे,मयुरी गाढवे, हिमांशी भोरे, राधिका लाखे, प्रांजली मदनकर, जुही फुकटकर यासह अनेक विद्यार्थी उपक्रमात सहभागी झाले.

विद्यार्थी प्रतिक्रिया
आमची सलग १२ तास बसून वाचन करण्याची क्षमता होती मात्र कधीही या क्षमतेचा वापर करण्यात आला नव्हता. या उपक्रमामुळे स्वतःच्या क्षमतेची ओळख झाली.

  • कु.प्रांजली मदनकर, विद्यार्थिनी, नरखेड

बॉक्स
व्यक्तिमत्त्व विकासाकरिता आवश्यक असणारे विविध उपक्रम अभ्यासकेंद्रात राबविले जातात.यामुळे भावी अधिकारी बनण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गुणांची जडणघडण होत आहे.

  • राहुल धवड, विद्यार्थी, काटोल

बॉक्स
विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी राबविलेला उपक्रम स्तुत्य आहे.अशा उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी वाचनासाठी प्रवृत्त होईल.

  • प्रमोद वानखेडे
    जिल्हा कार्यक्रम अधिकारी, नागपूर