दोडकी येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, मनामनात देश भावना वाढायला हवी संजय डांगोरे

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त प्रत्येकाच्या मनामनामध्ये राष्ट्रभावना ,देशाबद्दलची आत्मीयता आणि सन्मान वाढविण्याचे कार्य व्हायला हवे.काटोल तालुक्यातील दोडकी या गावांमध्ये तिरंगा कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष तथा समाजसेवक श्री संजय डांगोरे यांनी आपले विचार व्यक्त केले.फक्त दोन-चार दिवस आपण देश प्रेम दाखवणे एवढचे पुरेसे नाही तर सदैव देश भावना मनामनात असावी .स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नसून काही नगरिक म्हनुन आपली जबाबदारी आणि कर्तव्य सुद्धा आहे .आतंकवाद आणि हुकूमशाही याला विरोध व्हावा आणि संयमी आणि अहिंसेच्या मार्गाने देशाची प्रगती व्हावी असे विचारही या निमित्ताने त्यांनी वेक्त केले .स्वातंत्र्य आणि संविधानाच्या विरोधात कुठलीही कार्य आम्ही करणार नाही असा संकल्पसर्व भारतीयांनी घेण्याची ही वेळ आहे .असे कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचायत समिती सदस्य संजयजी डांगोरे यांनी यावेळी व्यक्त केले. दोडकी गावातील अंगणवाडी आणि इतर विद्यार्थ्यांना यावेळी कपड्यांचे आणि खाऊ चे वाटप सुद्धा करण्यात आले.”घरोघरी तिरंगा ,मनामनात देशभावना” यासंदर्भात उपस्थीताना यावेळी माहिती देण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे काटोल पंचायत समितीचे खंड विकास अधिकारी श्री मनोहर बारापात्रे कृषी अधिकारी सचिन गोरटे शिक्षण विस्तार अधिकारी नरेश भोयर ,सरपंच श्री जानबाजी तांदळे माजी सरपंच रामेश्वर रेवतकर श्री वंसत डोंगरे श्री धनराज थोटे ,भरत रेवतकर ,जगदीश चौव्हान,गावातील प्रतिष्ठित नागरिक, मुख्याध्यापक तथा ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच कैलास बलकी,श्री बावने सर श्री रेवतकर आणि नागरिकांची यांची मोठ्या प्रमानात उपस्थिती होती.