कोवीड 19 समाजप्रबोधन.. संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला परतवुन लावूया:संजय डांगोरे

प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ,काटोल

कोरोना ची पहीली आणि दुसरी लाटेला आपण परतविली आता संभाव्य तिसऱ्या लाटेला सुद्धा सक्षमपणे परतविणयासाठी आपण तयार राहीले पाहीजे असे विचार काटोल पंचायत समितीचे सदस्य संजयजी डांगोरे यांनी गावा गावात झालेल्या सभेमध्ये व्यक्त केले.
जिल्हाधिकारी नागपुर यांचे पत्रानुसार काटोल तालुक्यात 28टिम द्वारे दिनांक 27मे ते 4जुन 2021या कालावधीत जवळपास 84 गावामधे जाउन कोरोना आणि त्याचे नंतरची उद्भवनारी परिस्थिती वर नियंत्रण ठेवनासाठी प्रशासनाद्वारे गावातील शाळा अथवा ग्राम पंचायत भवन मधे समाजप्रबोधन,क्लीप द्वारे माहीती देण्यात येत आहे.यामधे जनप्रतिनिधी सोबतच तहसील कार्यालय,पंचायत समीती कार्यालय,कृषी कार्यालयाचे अधिकारी सुद्धा उपस्थीत राहात आहे.
यावेळी मायक्रोमायसीस अथवा लसीकरण आदीबाबत आढावा घेण्यात आला व संबधिताना आवश्यक निर्देश देण्यात आले.
मेटपांजरा जिप सर्कल अंतर्गत येनारे पंचधार,गनेशपुर,कचारी सांवगा ,वाई ,गरमसुर ,सबकुंडआदी अनेक गावात समाजसेवक संजय डांगोरे यांनी कोरोना बद्दल जनजागृती केली.
यावेळी तहसीलदार अजय चरडे,,बीडीओ.संजय पाटील,ना तहसीलदार निलेश कदम,ना. तहसीलदार जवंजाळ ,श्रीमती लता चलपे,युवराज मिसाळ,रवी जैस्वाल,शरद वरोकर,ताजु ढेंगळे,अनंत उमप,यांचे सह गावागावातील सरपंच,उपसमरपंच,सचीव,अंगनवाडी सेवीका,आशा वर्कर,शिक्षक,कंट्रोल दुकानदार,पटवारी,कृषी सहाय्यक,रोजगार सेवक, आदी गाव पातळीवर कार्य करनारे कर्मचारी उपस्थित होते.