

प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ, काटोल
प्रतिनिधी/६ जानेवारी
काटोल – सावित्रीबाई फुले यांनी समाजाचा विरोध पत्करून शिक्षणाची ज्योत तेवत ठेवली.शिक्षणामुळे महिला सक्षम होऊन त्यांच्या पंखांना बळ मिळाले, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले विचारमंच अध्यक्षा वैशाली डांगोरे यांनी महिला शिक्षण दिन कार्यक्रमात केले.
सावित्रीबाई फुले विचारमंच कडून सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रम काटोल येथे घेण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैशाली डांगोरे तर प्रमुख अतिथी म्हणून विचारमंचाच्या सचिव अँड.भैरवी टेकाडे, वैशाली श्रीखंडे, कांचन टेंभे, कविता कांडलकर, सुवर्णा पवार, मोहना खरबडे प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँड. भैरवी टेकाडे , संचालन प्रतिभा भेलकर तर आभार प्रदर्शन सोनाली तिजारे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी रजनी नेरकर, वंदना डांगोरे,अर्चना वरोकर, रेखा पवार, शितल चर्जन, उषा भोयर, सविता उमप यांनी परिश्रम घेतले.
