
तालुका प्रतिनिधी/१२ ऑगस्ट
काटोल – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्य काटोल पंचायत समिती कडून भव्य रँलीचे आयोजन केलेले होते.काटोल येथील मुख्य रस्त्याने निघालेल्या रँलीत शाळेचे विद्यार्थी,आशा सेविका, अंगणवाडी सेविका,उमेद सेविका,अधीकारी तथा पदाधीकारी य़ावेळी उपस्थीत होते. हातात तिरंगा ध्वज आणि आणि भारत देशाचा जयघोष तथा स्वातंत्र्यसेनानीचा जयजयकार करीत रँलीचा समारोप डॉ. आंबेडकर चौक येथे करण्यात आला.या भव्य दिव्य रँलीत बँडपथक,डिजे ,पथनाट्याचा समावेश होता.
यानिमित्त महापुरुषांच्या सुविचाराने,पताका, फुगे, फुलांनी नववधू प्रमाणे पंचायत समिती सजवलेली होती.
यावेळी जि.प.सदस्य सलील देशमुख, उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर , तहसीलदार अजय चरडे प्रामुख्याने उपस्थित होते. रँलीचे आयोजन यशस्वी करण्याकरीता सभापती धम्मपाल खोब्रागडे,उपसभापती अनुराधा खराडे,तिरंगा कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष तथा समाजसेवक संजय डांगोरे ,निशीकांत नागमोते,अरुण उईके,चंदा देव्हारे, गट विकास अधिकारी मनोहर बारापात्रे,सहा.बीडीओ संजय पाटील आदींनी केले. सर्व कार्यक्रमाचे संचालन पंचायत समीती सदस्य संजयजी डांगोरे यांनी केले.
