जि.प.विद्यार्थ्यांनी जाणला जिल्ह्याचा इतिहास,पुरातत्व संशोधक डॉ.मनोहर नरांजे यांनी सांगितला इतिहास

वेध प्रतिष्ठान, नागपूरचा उपक्रम

प्रतिनिधी:ऋषिकेश जवं जाळ, काटोल


काटोल – महाराष्ट्र शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ उपक्रमांतर्गत वेध प्रतिष्ठान, नागपूर तर्फे ‘ग्रेट भेट’ कार्यक्रम घेण्यात आला.यात पुरातत्व व इतिहास संशोधक डॉ.मनोहर नरांजे यांनी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांना झूम वेबिनारद्वारे ‘नागपूर जिल्ह्यातील स्थानिक इतिहास’ या विषयावर मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनी डॉ.नरांजे याची मुलाखत घेतली.

यावेळी डॉ.नरांजे म्हणाले, इतिहास हा भूगोलावर घडीत असतो.काल्पनिक इतिहासाला महत्व न देता पुरातण वास्तू व पुरावे या आधारावर खरा इतिहास विद्यार्थ्यांना माहीत व्हावा.मराठी भाषेतील पहिला ग्रंथ ‘विवेकसिंधु’ नागपूर जिल्ह्यात लिहिला गेला.ऐतिहासिक ‘नगरधन’ सारखे समृद्ध व व्यापारी केंद्र नागपूर जिल्ह्यात आहे. बख्त बुलंदशहा राजा यांनी ३०० वर्षांपूर्वी नागपूर शहर बसविलेले आहे.नागपूर जिल्ह्यात अडम, रामटेक, पारशिवनी,काटोल, नरखेड या भागात भरपूर पुरातन वास्तू आहे.खोदकामात बऱ्याच वस्तू सापडलेल्या आहे.या वस्तूचे जतन करण्यासाठी ‘स्थानिक संग्रहालय’ निर्मिती शासन स्तरावर होणे आवश्यक आहे.तेव्हाच आपल्या पूर्वजांचा इतिहास भावी पिढीला कळेल.

बॉक्स
इतिहासात विदर्भावर अन्याय..
बालभारती, पुणे द्वारा पाठ्यपुस्तके तयार करतांना विदर्भावर अन्याय केला जातो.पाठ्यपुस्तके मंडळावर पश्चिम महाराष्ट्राचा भरणा अधिक असल्यामुळे विदर्भाचा इतिहास फक्त चवीपुरता असतो. विदर्भाला पौराणिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी मोठ्या प्रमाणात लाभूनीही दुर्लक्षित आहे.याकरीता स्थानिक लेखकांनी स्थानिक विषयावर लेखन करावे.