शाळा पूर्वतयारी मेळाव्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात नवचैतन्य – पं. स.सदस्य संजय डांगोरे

# रिधोरा जिल्हा परिषद शाळेमध्ये “शाळा पुर्व तयारी मेळावा” संपन्न

तालुका प्रतिनिधी/२०एप्रिल
काटोल – जागतिक संकट कोविड नंतर बऱ्याच दिवसाने शैक्षणिक क्षेत्रात नवीन चैतन्य संचारले आहे.विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी पालकांसोबत समाजाच्या सहभागातून राबविण्यात आलेला शाळा पूर्व मेळावा शैक्षणिक क्षेत्रासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन पंचायत समिती सदस्य संजय डांगोरे यांनी केले.
काटोल तालुक्यातील जि.प.प्राथमिक शाळा,रिधोरा येथे शाळा पुर्व तयारी मेळावा आयोजीत केला होता.
कोरोना काळानंतर विद्यार्थ्याचे झालेले शैक्षणिक नुकसान भरुन काढण्याकरीता महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यासाठी ही सकारात्मक पाऊले उचलेली आहे.
विद्यार्थ्याचे मानसिक,शारिरीक,बौद्धीक चाचण्या घेऊन उन्हाळी सुटीत पालकाचे मदतीने अभ्यास कसा करायचा हे या मेळाव्यात पालक आणि विद्यार्थ्यांना सांगीतले.
शाळा पुर्वतयारी मेळाव्याचे उद्घाटन पंचायत समीती सदस्य संजयजी डांगोरे यांचे हस्ते करण्यात आले,प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संजय पाटील,सरपंच नलिनीताई राऊत, गटशिक्षणाधिकारी संतोष सोनटक्के, शिक्षण विस्तार अधिकारी नरेश भोयर,शाळा समीतीचे अध्यक्ष किशोर महल्ले,सुनिल कोठे,दिलीप तांबुस्कर, वैभव राऊत प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी पालक शिक्षक विद्यार्थी आदींची उपस्थिती लक्षणिक होती.
यावेळी पंचायत समीती सदस्य संजय डांगोरे यांचे 15 वित्त आयोगातील फंडामधुन रिधोरा शाळेला दिलेल्या “हँडवाँश स्टेशन” ची पाहणी आणि पुजा करण्यात आली.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका नंदा सरोदे, शिक्षक संजय वंजारी, भावना बगवे, शुभांगी महल्ले उपस्थित होते.