

प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ, काटोल
ग्रामीण विद्यार्थ्यांत क्षमता भरपूर असतात – जि.प.सदस्य सलील देशमुख
विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा केंद्राचा लाभ घ्यावा – सलील देशमुख
राज्यातील ग्रामीण भागातील पहिले केंद्र
दरवर्षी मिळणार दीड कोटीचा निधी
तालुका प्रतिनिधी/१७ फेब्रुवारी
काटोल : मानव विकास कार्यक्रम अंतर्गत जि.प.माजी शासकीय माध्यमिक शाळा, काटोल येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे भूमिपूजन नुकतेच(दि.१७फेब्रुवारी) जि.प.सदस्य सलील देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.सदस्य चंद्रशेखर कोल्हे, शुभहस्ते जि.प.सदस्य सलील देशमुख तर प्रमुख अतिथी पं.स.सभापती धम्मपाल खोब्रागडे, उपसभापती अनुराधाताई खराडे,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तारकेश्वर शेळके, नरखेड माजी सभापती वसंत चांडकडॉ.अनिल ठाकरे, जयंत टालाटूले, गणेश चन्ने प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी सलील देशमुख म्हणाले, महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील पहिले स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र काटोल येथे उभारण्यात येत आहे.या केंद्राला दरवर्षी दीड कोटी रुपयांचा निधी शासनाकडून उपलब्ध होणार आहे.ग्रामीण विद्यार्थ्यांत क्षमता भरपूर आहे मात्र उचित मार्गदर्शन उपलब्ध होत नसल्यामुळे शासकीय सेवेत जाण्याचे प्रमाण कमी आहे.या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा लाभ काटोल-नरखेड तालुक्यातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात घ्यावा असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी दिनेश धवड, संचालन राजेंद्र टेकाडे तर आभार प्रदर्शन प्रा.परेश देशमुख यांनी मानले.कार्यक्रमासाठी जि.प.कार्यकारी अभियंता राकेश वाघमारे, कनिष्ठ अभियंता तुलाराम तलमले, अजय कांबळे, गणेश सावरकर, अयुब पठाण, डॉ.राजू कोतेवार, अजय लाडसे, अमित काकडे, निखिल देशमुख आदींनी परिश्रम घेतले.
