
महिला शिक्षण दिन सप्ताह निमित्त आयोजन
२० शिक्षिकांचा केला सन्मान
तालुका प्रतिनिधी/८जानेवारी
काटोल : भारतातील पहिली महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिवस शासनाच्या निर्देशाप्रमाणे महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात आला.या सप्ताहनिमित्त पंचायत समिती काटोल कडून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या २० शिक्षिकांचा सन्मान पंचायत समिती सभागृहात करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती धम्मपाल खोब्रागडे तर प्रमुख अतिथी म्हणून उपसभापती अनुराधा खराडे, पं. स.सदस्य संजय डांगोरे, पं. स.सदस्य निशिकांत नागमोते, पं. स.सदस्य निलिमा ठाकरे, पं.स.अरुण उईके, पं.स.सदस्या चंदा देव्हारे, पं. स.सदस्या लता धारपुरे व गट विकास अधिकारी विजय धापके उपस्थित होते.
सत्कारामूर्ती मध्ये रजनी मानकर(कोंढाळी), वैशाली बोरकर (वंडली), बेबी रोडे (पारडसिंगा), कल्पना देवतळे (वाढोणा), रविदिनी जैवार(अंबाडा), कविता थोटे(खानगांव), वर्षा खळतकर (मेंटपांजरा), साधना चिखले(डोरली), विजया वैद्य(जामगड), ममता मेन(मासोद), रेखा तिजारे(पुसागोंदी), कल्पना धवड(ढवळापूर), वंदना भोयर(लिंगा), सिंधू काळे(मूर्ती), निलम दुपारे(आजनगांव), शुभांगी उबाळे(रिधोरा), वर्षा कोटमकर(सोनोली), प्रमिला सोमकुंवर(काटोल), प्रतिभा वानखेडे(गोंडीखापा), सरिता मडके(सालई) यांचा शाल,श्रीफळ,सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी दिनेश धवड, संचालन वनिता गोरे तर आभार प्रदर्शन शिक्षण विस्तार अधिकारी संतोष सोनटक्के यांनी केले.

ऋषिकेश जवंजाळ, काटोल
