
प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ, काटोल
काटोल:-
काटोल आणि नरखेड येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता तसेच या भागातील नागरिकांची रूग्णालयातील वाढती रुग्ण संख्या पाहता ग्रामीण रुग्णालय येथे ऑक्सीजन सिलेंडर विहीत वेळेत मिळत नाही त्यामुळे रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. हि सर्व बाब लक्षात घेता ग्रामीण रुग्णालय काटोल व नरखेड येथे ६० किलोमीटरची कायम स्वरूपी ऑक्सीजन टॅंक बनविण्यात यावी अशी मागणी श्री. सलील देशमुख जिल्हा परिषद सदस्य नागपूर यांनी मा. जिल्हाधिकारी, नागपूर यांचेकडे निवेदन सादर केले. उपरोक्त ऑक्सिजन टॅंक लवकरात लवकर मंजूर करण्यात यावे अशी मागणी सलिल देशमुख यांनी केली. तसेच संबंधित विभागाकडे ऑक्सिजन टॅंक होणेबाबत सतत ते स्वतः पाठपुरावा करीत आहे.
