

प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ,काटोल
केंद्रप्रमुख अनिल जैवार यांचा निरोप समारंभ
काटोल – शिक्षण क्षेत्रासाठी झटणारा व कोणत्याही शैक्षणिक कार्यासाठी सदा तत्पर असणारा प्रामाणिक शिक्षक म्हणजे अनिल जैवार होय.त्यांनी गेले ३२ वर्ष शाळेसाठी खूप मोठे योगदान दिले आहे.असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी दिनेश धवड यांनी कचारी सावंगा केंद्राचे केंद्रप्रमुख अनिल चंपतराव जैवार यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमात केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती धम्मपाल खोब्रागडे तर प्रमुख अतिथी म्हणून पं.स.सदस्य संजय डांगोरे, गटशिक्षणाधिकारी दिनेश धवड, शिक्षण विस्तार अधिकारी संतोष सोनटक्के,मंथन फौंडेशनचे अध्यक्ष सुधीर बुटे, सरपंच कल्पनाताई अनिल गजभिये, शा.व्य. स. अध्यक्ष कविताताई दिवाकर वासनिक प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी शिक्षण विभाग, म.रा.शिक्षक सेना व केंद्रातील सर्व शिक्षकांच्या वतीने जैवार यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह,पुष्पगुच्छ देऊन सेवानिवृत्ती बाबत सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख राजू बगवे, संचालन भावना बगवे तर आभार प्रदर्शन प्रियंका जंगले यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय धवड,संजय कडू, संजय वंजारी, शुभांगी महल्ले,चंद्रशेखर गजभिये, प्रकाश तरटे यांनी परिश्रम घेतले.
