विद्यार्थ्यांचे श्रमदानातून गांधीजींना अभिवादन..

जि.प.स्पर्धा परीक्षा केंद्र, काटोलचा उपक्रम

कृतीतून जीवनशिक्षणाचा संदेश

तालुका प्रतिनिधी/२ ऑक्टोबर
काटोल : महात्मा गांधी जयंती निमित्त जि.प.स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यास केंद्र, काटोल येथे कृतीतून जीवनशिक्षणाचा संदेश दिला.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहे.या उपक्रमातुन विद्यार्थ्यांच्या अंगी लोकशाहीला पूरक जीवनमूल्ये रुजविली जावी हा उद्देश आहे.
म्हणूनच अभ्यासकेंद्रातील विद्यार्थ्यांनी श्रमदान व वृक्षारोपण कार्यक्रम राबवून महात्मा गांधी यांना कृतीतून अभिवादन केले.अभ्यासकेंद्राचा परिसर व क्रीडांगण स्वच्छ करून गांधींना अभिप्रेत असणारा ‘स्वच्छता’ गुण आत्मसात केला.अशी माहिती गटशिक्षणाधिकारी संतोष सोनटक्के यांनी दिली.
उपक्रम केंद्र समन्वयक राजेंद्र टेकाडे व एकनाथ खजुरीया यांच्या मार्गदर्शनाखाली राहूल धवड, शरयू मलमकर, प्रतिक मानेराव, रुचिता नासरे, राधिका लाखे,अजित निंबूळकर, प्रविणा काळे,भूषण ठोबरे, गुंजन रिठे, मनीष लाड, शतंनू महल्ले, नोमदेवी खुरपडे, नवीन बासेवार,धनश्री खसारे, गौरव गाढवे,अंजली पवार, प्रितम नाईक, मयुरी गाढवे, वैष्णवी ठाकरे, अरुणा नेहारे यांनी श्रमदान केले.