
जिजाऊ लेकींचा सोहळा २०२२
महिला दिनाचे औचित्य
म.रा.शिक्षक सेनेचा उपक्रम
तालुका प्रतिनिधी/७मार्च
काटोल – जिजाऊची लेक तू,
तुचं स्वराज्याची उद्गाती…..!,
जिजाऊच्या समर्थ इतिहासाच्या ,
तुचं तेवत ठेवल्या वाती……!!
जागतिक महिला दिनाच्या औचित्यनिमित्त महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, नागपुर द्वारा शिक्षण क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या जिजाऊच्या लेकींचा सत्कार महिला दिनाच्या पूर्वसंध्येला करण्यात आला.
शिक्षिका ज्या शाळेत विद्यादानाचे कार्य करीत आहेत त्याचं शाळेत, विद्यार्थ्यांसमोर शिक्षिकांचा सत्कार मानपत्र, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल,पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
यात जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षिका संगिता दामोदर मोहनकर ( हमलापूरी, पं.स .रामटेक),निलिमा भिमराव राऊत ( तोंडाखैरी,पं.स कळमेश्वर), तसेच तालुकास्तरीय सत्कारमुर्ती सावनेर – प्रणाली सुरेशराव खरबडे,कळमेश्वर- सुषमा शरदचंद्र विघरे, मौदा – सीमा गोपाळराव उताणे,काटोल – वैशाली सुरेशराव बोरकर, नरखेड -विमल गंगाधर नागमोते, कुही – हर्षला गणपत धार्मिक, हिंगणा -कीर्ती पुरूषोत्तम समरीत, उमरेड -योगिता संजय मारोडकर,रामटेक -जयश्री विकास उईके,पारशिवनी-माया मधूकर भूते, कामठी -माधुरी नरेश कोलते, भिवापूर – श्यामपात्रा अशोक राऊत,नागपुर ग्रामीण – वंदना मधुकर वैरागडे यांचा सत्कारमूर्तीत समावेश आहे.
सदर कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता विभागीय अध्यक्ष टिकाराम कडूकर,जिल्हाध्यक्ष दिलीप लंगडे, महिला जिल्हाध्यक्ष छायाताई ठाकरे , जिल्हासचिव संतोष माळवे, जिल्हा कार्याध्यक्ष तुषार अंजनकर, जिल्हा कोषाध्यक्ष रमेश गंधारे, जिल्हा प्रतिनिधी शेषराव टाकळखेडे, भूषण आगे, आशुतोष चौधरी,प्रकाश चौधरी, बंडूभाऊ कुळमेथे,कैलाश चौधरी, गजानन बेले, जगदीश इनवाते ,नंदकिशोर बावनकुळे,धर्मराज डोईफोडे, शशीकांत पाटील, मुरलीधर सातपुते,विजय धवड, विवेक बोरकर, विलास लोखंडे, दिलीप शेंडे , प्रतिभाताई गोहणे, आशाताई गोहणे, सपना मानकर आदींनी अथक परिश्रम घेतले.
बॉक्स
काटोल तालुक्यातून सौ.वैशाली सुरेश बोरकर यांचा सत्कार काटोल पंचायत समिती सभापती धम्मपाल खोब्रागडे यांच्या शुभहस्ते झाला.यावेळी पं. स.सदस्य संजय डांगोरे, शिक्षण विस्तार अधिकारी नरेश भोयर, सरपंच रेखचंद सावरकर, केंद्रप्रमुख राजू धवड, शिक्षक सेनेचे शेषराव टाकळखेडे, दिलीप वरोकर, मोहन डांगोरे,राजेंद्र बोरकर, सतिष ढबाले, किरण डांगोरे, निर्मला राऊत, ललिता खरबडे प्रामुख्याने उपस्थित होते.
