कोविड लसीमुळे चुंबकीय शक्ती निर्माण होणे अशक्य समाजात अंधश्रद्धा पसरू नका:शिक्षण अभ्यासक राजेंद्र टेकाडे यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ, काटोल

लोकहीत महाराष्ट्र नागपूर ग्रुपला जॉईन करा

https://chat.whatsapp.com/KDoKv0xUj9OG6Fhz3TPV6W


काटोल – कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर शरीरात चुंबकीय शक्ती निर्माण होत असल्याची अफवा समाजात पसरत आहे.शरीराला स्टील चमचे, ताट, वाटी चिकटतात असा दावा फोल असून कोरोना संकटात समाजात अंधश्रद्धा पसरू नका असे आवाहन शिक्षण अभ्यासक राजेंद्र टेकाडे यांनी केले आहे.
कोरोना लसीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते व कोरोनाला आळा बसतो.त्या लसीमुळे शरीरात चुंबकीय शक्ती निर्माण होत नाही.असे असते तर कोविड लस घेतलेल्या प्रत्येकाच्या शरीरात चुंबकीय तत्व निर्माण झाले असते.
आपल्या शरीरातून घाम येतो. तो घाम शरीरावर चिकटतो.या घामामध्ये ‘सिबम’ हा चिकट द्राव असतो.हा ‘सिबम’ चिकट असल्यामुळे त्वचेवर चिकचिकपणा निर्माण होतो.त्या घामामुळे केवळ धातूंच्याच नव्हे तर प्लास्टिकच्या वस्तू चिकटतात.ज्या व्यक्तीच्या त्वचेवर ‘सिबम’ चिकटलेला असतो त्या व्यक्तीच्या शरीरावर या वस्तू चिकटतात.शरीर स्वच्छ पाण्याने किंवा साबणाने धुतले तर ‘सिबम’ द्राव नष्ट होतो व वस्तू चिकटत नाही.
तुमच्या परिसरात कुणी कोरोना लसीमुळे चुंबकीय तत्व निर्माण झाल्याचा दावा करीत असेल तर त्वचेवर पावडर लावा व वस्तू चिकटवून दाखव म्हणा.जमिनीवर पडलेला चमचा चुंबकीय शक्तीने उचलून देण्याचे आव्हान करा.त्यांचा भांडाफोड आपल्या लक्षात लगेच येईल असे प्रतिपादन शिक्षण अभ्यासक राजेंद्र टेकाडे यांनी केले आहे.

तालुका प्रतिनिधी/१५ जून:ऋषिकेश जवंजाळ,काटोल