नैसर्गिक आपत्ति चार लाखाचा चेक वाटप कार्यक्रम.

प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ, काटोल

स्थानिक रिधोरा येथे पावसाळ्याच्या दिवसात कोकर्डा येथील शिवारात इंदुबाई तभाने पुरात वाहून गेल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यु झाला होता घरची करती बाई गेल्याने पूर्ण कुटुंब आर्थिक संकटात सापडले होते. इंदुबाई यांच्या मृत्यूची बातमी कळताच स्थानिक लोकप्रतिनिधि यांनी परिवाराला सांत्वना दिली व शासनाकडून काही मदत मिळेल याकरिता सतत पाठपुरावा केला . जिल्हा परिषद् सदस्य सलिल देशमुख, पंचायत समिति सदस्य संजय डांगोरे, सरपंच नलिनी राऊत, तहसीलदार अजय चरडे नायब तहसीलदार निलेश कदम यांच्या हस्ते इंदुबाई यांचे पती रामराव तभाने यांना चार लाख रूपयेचा चेक मंगळवारला प्रदान करण्यात आला. याप्रसंगी रिधोरा गावच्या पोलिस पाटिल सुषमा मुसळे , सामाजिक कार्यकर्ते जयंत टालाटूले, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण टालाटूले , अमोल डांगोरे, शेतकरी कृति समितीचे सचिव भूषण मुसळे , पत्रकार प्रशांत पवार , प्रमोद काळे,भागवत महल्लेे व तभाने परिवारातील सदस्य व गावकारी उपस्थित होते.