

प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ, काटोल
रिधोरा:-
येथे सोमवार दिनांक 11 जानेवारीला रंजितबाबु देशमुख यांच्या अमृतमहोत्सव वर्षानिमित्य निशुल्क आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. सकाळी कार्यक्रमाचे उदघाटन पंचायत समिति सदस्य संजय डांगोरे सरपंच नलिनीताई राऊत उपसरपंच मोहन काळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले . मुख्य संयोजक डॉक्टर अनिरुद्ध देवके यांच्या मार्गदर्शनात सम्पूर्ण शिबिराचे आयोजन लता मंगेशकर हॉस्पिटल यांनी केले . माजी आमदार डॉक्टर आशिशबाबु देशमुख यांनी शिबिराला भेट दिली असता शिबिरार्थ्यांना संबोधित करताना लोकांच्या आरोग्याच्या काळजीसाठी माजी मंत्री रंजितबाबू ज्या प्रमाणे कार्य करीत आहे त्याच प्रमाणे आम्ही सुद्धा लता मंगेशकर हॉस्पिटल च्या माध्यमातून लोकांच्या आरोग्याची काळजी घेत असून ग्रामस्थांनी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रसंगी करण्यात आले. आरोग्य शिबिरात चर्मरोग तपासणी , डोळे बीपी शुगर रक्त तपासणी यासारख्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. आरोग्य शिबिराचे आयोजन ग्रामपंचातत परिसरात करण्यात आले. शिबिरात डॉक्टर अनिरुद्ध देवके सायली भगत अविरल मेश्राम रौनक ढवळे अभिषेख मानकर डॉक्टर कीर्ति गौरी दिशा सचिन रहांगडाले आदि डॉक्टर स्टाफ होता. संयोजक रमेश रामटेकर मीणा पवार यांनी लता मंगेशकर हॉस्पिटलच्या वतीने जबाबदारी पार पाडली.
प्रसंगी रक्तदान शिबिरसुद्धा घेण्यात आले 300 पेशंट तपासन्यात आले व पुढील निदानासाठी 50 रेफर करण्यात आले. शिबिराच्या यशस्वीतेकरिता लता मंगेशकर हॉस्पिटलचे डॉक्टर व कर्मचारी ग्रामस्थांच्या वतीने विनोद नागपुरे वैभव राऊत प्रवीण टालाटूले भूषण मुसळे कल्पनाताई नागपुरे,ग्रामपंचायत सदस्य आशा वर्कर रिधोरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर नागपूरे व कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी व युवकांनी परिश्रम घेतले.
