डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्य व बुद्ध जयंती तसेच वामनदादा कर्डक यांच्या जन्म शताब्दी वर्षा निमित्य विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्य व बुद्ध जयंती तसेच वामनदादा कर्डक यांच्या जन्म शताब्दी वर्षा निमित्य डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाच्या वतीने घेण्यात आलेल्या बुद्ध भीम गीतांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हो होते या बुद्ध भीम गीतांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाप्रसंगी तालुक्यातील विविध क्षेत्रातील उकृष्ट अशी कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
हा सत्कार समारंभ सोहळा दिं १४ मे २०२२ रोज शनिवारला शिवाजी व्यायाम प्रसारक मंडळ यांचे भव्य पटांगणात सुप्रसिद्ध पार्श्वगायक ख्यातनाम प्रकाशनाथ पाटणकर यांच्या उपस्थितीत पार पडला असून यात पत्राकारिता क्षेत्रात साप्ताहिक राळेगाव समाचार चे संपादक फिरोज लाखाणी तसेच दैनिक सुवर्ण महाराष्ट्राचे जिल्हा प्रतिनिधी विशाल मासुळकर तर दैनिक नमो महाराष्ट्राचे तालुका प्रतिनिधी राष्ट्रपाल भोंगाडे तर सामाजिक क्षेत्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गोवर्धन वाघमारे, तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष अंकुश मुनेश्वर ,यवतमाळ येथील साहित्यिक गोपीचंद कांबळे तसेच पोलीस क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी बजावत असणारे (खुपिया )माजी सैनिक युवराज पाईकराव तर कोरोना काळात ज्यांनी निशुल्क सेवा दिली असे डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाचे अध्यक्ष विठ्ठल लढे, अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार समारंभ सोहळा व सन्मान चिन्ह साहित्यिक गोपीचंद कांबळे यांच्या हस्ते पार पडला असून या कार्यक्रमाला उपस्थित डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाचे बाबाराव नगराळे,इंद्रजीत लभाने, विनायक नगराळे,बबलू कांबळे, बबन ढाले,अक्षय नगराळे, चंद्रगुप्त भगत,रमेश वनकर,अक्षय ढाले, राजू नगराळे,चेतन लढे आदी उपस्थित होते.