

प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ,काटोल
स्थानिक लीलाबाई पवार यांच्या घराला मंगळवार पहाटे सव्वा पाच च्या सुमारास जोराची आग लागल्यामुळे बैठक व स्वयंपाकघर जळून ख़ाक झाले. लीलाबाई पवार या सकाळी उठल्या व चहा मांडण्यासाठी गेल्या असता सिलेंडला आग लागली व काही कळायच्या आत आगीने रूद्र रूप धारण केल्याने त्यांनी आपल्या मुलाला उठऊंन आरड़ाओरड करायला सुरुवात केली व त्या आवाजाने शेजारी खड़बडून जागे झाले व समोर आग पाहताच अनेकांनी आपापल्या घरच्या बादल्या घेऊन आगिवर पानी मारण्यास सुरुवात केली काही शेजाऱ्यांनी आपल्या घरच्या इलेक्ट्रिक मोटर नळीने पाणी टाकले पाऊन तासाने आगिवर नियंत्रण मिळविन्यास शेजाऱ्यांना यश आले.
इकडे सिलेंडर विझविन्यात आले तो पर्यन्त सर्व घरघुती जीवनावश्यक वस्तु भांडी अन्नधान्य फर्नीचर कवेलू शेतीजन्य साहित्य जळून ख़ाक झाले होते.
घटनेची माहिती विशेष कार्यकारी अधिकारी प्रशांत पवार यांनी नायब तहसीलदार, तलाठी यांना दिली. संजय डांगोरे प.स.सदस्य तसेच गावच्या सरपंच नलिनी राऊत ग्राम पंचायत सदस्य अमोल डांगोरे सामाजिक कार्यकर्ते भूषण मुसळे प्रवीण टालाटुले यांनी पाहणी केली व तलाठी गुणवंत मारोतकर यांनी घटनेचा पंचनामा केला।। पोलिस पाटिल सुषमा मुसळे यांनी काटोल पोलिस स्टेशनला लीलाबाई पवार यांच्या घराला आग लागल्याचे कळविले व काही वेळातच पोलिस पथक बीट जमादार दलाल यांच्या नेतृत्वात घटनास्थळ गाठून नुकसानीचा पंचनामा केला तसेच एच पी ग्यास चे प्रतिनिधि येऊन पाहणी केली. आग विझविन्यासाठी संदीप पवार अजय उमाळे प्रशांत इरखड़े स्वप्निल डांगोरे भाऊसाहेब पवार दिलीप पवार बंडू खोडे प्रशांत पवार व शेजारी यांनी प्रयत्न केले तसेच शासनाकडून लीलाबाई यांना अन्नधान्य पुरविन्यात आले. आग ही सिलेंडर लीकेज असल्यामुळे लागली अशी चर्चा स्थानिक नागरिक करीत होते पुढील तपास काटोल पोलिस करीत आहे
