वेध’ तर्फे समाज व साहित्यावर ऑनलाइन चिंतन

प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ, काटोल

वेध प्रतिष्ठान, नागपूर चा उपक्रम

वेबिनारमधून महिला दिन साजरा

तालुका प्रतिनिधी/८मार्च
काटोल – वेध प्रतिष्ठान, नागपूर तर्फे’जागतिक महिला दिन’ निमित्त ‘समाज व साहित्य’ या विषयावर कोरोना संकटामुळे ऑनलाइन वेबिनार मधून चिंतन करण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून पालकमैत्री अभियान संयोजिका डॉ.संध्याताई पवार यांनी ‘समाजाकडून साहित्याकडे’ या विषयावर तर कथा लेखिका व साहित्यिक कल्पनाताई नरांजे
यांनी ‘साहित्याकडून समाजाकडे’ या विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी डॉ.संध्या पवार म्हणाल्या,सामाजिक कार्य करतांना आलेल्या अनुभवावर आधारित साहित्य निर्मिती ही वाचकांच्या स्मरणात राहते.समाज कार्य करतांना प्रेरणा मिळत गेली याच प्रेरणेतून साहित्य कृतीचा जन्म झालेला आहे.अनुभव सर्वात मोठा शिक्षक आहे.अनुभवातून साहित्यनिर्मिती व साहित्यनिर्मितीतून समृद्धी होते.
यावेळी कल्पना नरांजे म्हणाल्या,साहित्य समाजावर प्रभाव पाडीत असतो.संत साहित्यातून जनजागृतीचे मोठे कार्य झालेले आहे.समाज विकासाचे कार्य सहित्यातून होत आलेले आहे.संत तुकडोजी महाराजांनी जीवन समृद्धीचा महामार्ग ‘ग्रामगीता’ मधून दिलेला आहे.साहित्यातून मनोरंनासोबतच समाज विकासाचा सकारात्मक संदेश जात असतो.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वेध महिला प्रमुख किर्तीताई पालटकर, व्यक्ती परिचय वैशालीताई ठाकरे, संचालन मंगलाताई लांडे तर आभार प्रदर्शन वासंतीताई गोमासे यांनी मानले.कार्यक्रमाकरिता प्रतिभा गोहणे, सुनिता घोरसे, सुनिता पारसे, सुषमा ताजने, वैशाली घरत, रिता नेवारे, सविता ठाकरे,सिमा पुसदकर, नंदा चांदूरकर, निलिमा राऊत, निर्मला इंगळे, मंगला खळतकर, माया शेंडे, मिना कोलते, इंदिरा गोंडाणे, इंदू शहारकर, अंकिता अंजनकर, आशा टेकाम, चित्रा घाडे, गुणज्ञा बावनकर यांनी सहकार्य केले.