जगतगुरु तुकोबाराय यांच्या जयंती निमित्त वाचनालयातील विद्यार्थ्याने केली स्वच्छ्ता जागृती

वरूर रोड: महान संत, जगतगुरु तुकोबाराय यांच्या जयंती निमित्त दरवर्षी प्रमाणे यावर्षी जगतगुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय वरूर रोड येथील विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत स्वच्छ्ता जागृती राबविली. ही जनजागृती सामाजिक कार्यकर्ते विशाल शेंडे, व मेघा करमनकर यांच्या मार्गदर्शनाखाली दरवेळी अशाप्रकारचे उपक्रम राबविले जाते. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा संपूर्ण स्वछ करण्यात आला.जगतगुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय वरूर रोड येथील विद्यार्थी दर महिन्याला एक दोन दिवस, तसेच महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी निमित्त वेगवेगळे उपक्रम राबवित असतात. सदर या उपक्रमात यश, बोरकुठे, प्रवीण चौधरी, मयूर जानवे, तुषार चोथले, केतन पिंपळशेंडे, साहिल मत्ते, अवघान आदी वाचनालयातील विद्यार्थी उपस्थित होते.