
दि. 14 फेब्रुवारीला अखिल वरोरा शिक्षक संघाच्या वतीने पं. स. वरोरा येथे सभापती व संवर्ग विकास अधिकारी यांना शिक्षकांच्या अनेक प्रलंबित मागण्यांविषयी निवेदन देण्यात आले . विशेषतः शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात अवघड क्षेत्रातील गावांच्या यादीचा प्रश्न अजून मार्गी लागलेला नाही . यापूर्वी वरोरा पं. स. ने एकूण 26 गावांची यादी निकष पूर्ण होत असल्यामुळे जि. प. ला पाठविली होती . पैकी फक्त 12 गावांची यादी जि. प. कडून प्रकाशित करण्यात आली होती व 14 गावांना या यादीतून वगळण्यात आले होते . आणि कालचाच दिवस हा आक्षेप घेण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे सगळ्यांचीच तारांबळ उडाली होती . अखेर काल सभापती महोदयांनी मुख्य कार्यपालन अधिका-यांशी दूरध्वनीवरुन संवाद साधून पूर्वीच्याच 26 गावांची यादी ग्राह्य धरण्यात यावी अशी विनंती केलेली आहे . निवेदनातील ईतर मागण्यांसंदर्भात लवकरच एक समस्या निवारण सभा लावण्यात येईल असे संवर्ग विकास अधिकारी यांनी सांगितले . तहसिल कार्यालयातही बी एल ओ मानधनासंदर्भात विचारणा केली असता त्यांचे चार महीन्यांचे मानधन प्रती महीना 2000/- प्रमाणे आलेले असल्याचे सांगण्यात आले व मागील ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान अधिकारी म्हणून केवळ पथक क्रमांक 209 पर्यंतचे मानधन मिळाले होते व यानंतरच्या पथकांचे मानधन प्रलंबीत होते . याबाबत ही तहसिल कार्यालयाने मागणी केलेली आहे . हे मानधन मार्च मध्ये मिळेल असे तहसिलदार वरोरा यांनी सांगितले आहे .
यावेळी अखिल वरोरा चे तालुका अध्यक्ष धनराज रेवतकर , सचिव विजय परचाके , कार्याध्यक्ष मनोहर पानघाटे , गणेश बोढे , संभाजी पारोधे , डागाजी बुरीले , गोपाळ गुडधे , अरविंद मिलमीले , प्रफूल्ल कोटावार , अजय भगत , गजानन नवघरे व ईतरही संघसैनिक उपस्थित होते . शिक्षकांच्या ईतर प्रलंबीत मागण्यांसंदर्भात पं. स. वरोराने लवकर हालचल न केल्यास संघटनेच्या वतीने आंदोलनाचा ईशारा देण्यात आलेला आहे .
