रुग्णसेवक रितेश दादा भरुट व प्राची ताई भरुट यांची “सौ. कौसरजहॉ ताई” त्यांच्याशी भेट

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

“दिग्रस” तालुक्यातील “कांडली” येथील “सौ. कौसरजहाॅ अजमद खान” ह्या ताई खांद्याच्या गाठीमुळं कित्येक दिवस त्रस्त असल्याने यवतमाळ येथील सरकारी दवाखाण्यात भरती होत्या.
त्याचवेळी रुग्णसेवक रितेश दादा भरुट व प्राची ताई भरुट यांची “सौ. कौसरजहॉ ताई” त्यांच्याशी भेट झाली. भरुट दांपत्यांनी आपल्या रुग्ण सेवेला लगेच सुरवात केली . त्यांनी” सौ. कौसरजहॉ” यांना “डॉ. वरुण डहाके सर” यांच्या प्रायव्हेट हॉस्पिटल मधे भरती करुन दिले व गरीबीची जाण ठेऊन “डॉ. वरुण डहाके सर व टिम” यांनी नाममात्र दहा हजारात “सौ.कौसरजहाँ” याँच्यावर शस्रक्रिया केली व त्यांच्या खांद्यातील गाठ काढुन टाकली.