
वणी : श्रीगुरुदेव सेना व वंचित बहुजन आघाडी व निर्मिती बहुद्देशीय संस्था व्दारा आयोजित वंचित निराधार लोककल्याण भियानांतर्गत निराधार मार्गदर्शन व व्यसनमुक्ती शिबीर काल ता. ३ मार्च २०२२ रोजी सार्वजनिक ध्यानमंदिरात ग्रामजयंतीच्या पर्वाची सुरवात करून संपन्न झाले असून यात २५ निराधार लाभार्थ्यांची निवड करण्यात आली.
वंदिनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती ग्रामजयंती म्हणून गावागावात साजरी केल्या जाते. ग्रामजयंती ही ग्राम विकासाला पाया भरणारी असावी व गावातील दिनदुबळ्यांच्या सेवेत असावी या उद्देशाने वंचित निराधार लोककल्याण अभियान वंचित बहुजन आघाडी, श्रीगुरुदेव सेना व निर्मिती बहुद्देशीय संस्था यांच्या संयुक्त आयोजनाने निराधार मार्गदर्शन व व्यसनमुक्ती शिबिर आयोजित करून गोरगरीब वयोवृद्ध,विधवा माता भगिनी व दिव्यांग लोकांसाठी निराधार योजनेचा लाभ मिळवून त्यांना जगण्याचा आधार निर्माण करून दिल्या जात आहे. यावेळी ३ एप्रिल हा दिवस छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मृती दिवस असल्याने सर्वांनी मौनश्रद्धांजली शिवरायांना अर्पण करून शिबिराची सुरवात केली. या शिबिराचे मार्गदर्शक म्हणून श्री गुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा वंचितचे तालुकाध्यक्ष दिलीप भोयर तर प्रमुख अतिथी म्हणून वंचितचे जिल्हाउपाध्यक्ष मंगल तेलंग , निर्मिती बहुद्देशीय संस्थेच्या सचिव सुकेशनी आसुटकर, वंचितचे तालुकाउपाध्यक्ष, निशिकांत पाटील, सुभाष परचाके, प्रतिमा मडावी, विना ढवळे, आदि मान्यवाई उपस्थित होते. यावेळी शिबीर यशस्वी करण्यासाठी राजू झाडे, सौ, जोत्सना झाडे, लटारी पिंपळकर,अशोक ताजने, अनिल ढवस, संजय मोहारे, यांनी परिश्रम घेतले. यावेळी सर्व निवड झालेल्या लाभार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ देऊन वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिखित राष्ट्रावंदनेने शिबिराची सांगता करण्यात आली.
