
वरोरा | १४ एप्रिल २२
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर तथा क्रांतीसुर्य म.ज्योतिबा फुले जयंती महोत्सव चारगांव बु.येथे संपन्न….. दि.13/04/22 ते 14/04/22असा दोन दिवसीय महोत्सवाचे आयोजन पंचशील बौद्ध महिला मंडळ तथा ग्रामवासी चारगांव बु.द्वारे करण्यात आले. दि.13/04/22 ला सांयकाळी भिमबुद्ध गीतांचा प्रभोधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. तर दि.14/04/22सकाळच्या सत्रात ध्वजारोहण व बुद्धपजापाठाने सुरुवात करण्यात आली.दुपारच्या बौद्धिक सत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष-योगीराज वायदुळे(सरपंच चारगांव बु.)तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.विजय गाठले यांनी भारतीय संविधान ने तमाम भारतीयांंचा मार्ग सुखकर व संरक्षित केलेला आहे, परंतु या संविधानाच्या संरक्षण, संवर्धन व सक्षमीकरणाची जबाबदारी मात्र संपूर्ण भारतीय जनतेची आहे,असे प्रतिपादन केले.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुने म्हणून राजेंद्र थुल(पोलीस पाटील चारगांव बु),छगनराव आडकीने(अध्यक्ष त.मु.समिती. चारगांव बु.) उपस्थित होते… सदर कार्यक्रमाची सांगता संविधान वाचनाने करण्यात आली… सांयकाळी धम्मरँली चे आयोजन करण्यात आले होते… अत्यंत शांतामय वातावरणात रँली चा सांयकाळी १०वाजता समारोप करण्यात आला.
