वर्धा येथील दैनिक साहसिक चे मुख्य संपादक रवींद्रजी कोटबकर यांच्या वाहनांवर पवनार रोडवरील पुलाजवळ अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या वाहनांवर हल्ला केला

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

वर्धा येथील दैनिक साहसिक चे मुख्य संपादक रवींद्रजी कोटबकर यांच्या वाहनांवर पवनार रोडवरील पुलाजवळ अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या वाहनांवर हल्ला केला, त्यामध्ये रविंद्रजी व त्यांच्या ड्रायव्हर गंभीर जखमी झाले असून … सेवाग्राम दवाखान्यात उपचार सुरू असतानाच प्रकृती चिंताजनक असल्याने नागपूर येथे हलविले आहे…!
निर्भीडपणे पत्रकारिता करीत असताना पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांपासून संरक्षणासाठी कायदे आहेत. मात्र, आजही सत्य समोर आणण्यासाठी ‘ग्राउंड रिपोर्टिंग’ करणाऱ्या, तसेच विरोधात लिहिणाऱ्या पत्रकारांवर हल्ले होत आहेत. केंद्र सरकारने पत्रकारांच्या संरक्षणासाठी कडक कायदा करण्याची गरज आहे.
प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या कायद्यांमध्येही आता कालानुरूप बदल करायला हवेत.

प्रमोद पाणबुडे
जिल्हाध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, वर्धा