राजकीय पार्टी चे पुढारी यांनीचं ओबीसी आरक्षणाबाबत समाजाची दिशाभूल केली आहे.अशा पुढाऱ्यांना सत्तेपासून रोखा -मधुसुदन कोवे

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

भारतीय लोकशाही ही सार्वोभौम आहे आणि संविधान सर्वोच्च न्यायमंडळ आहे मग या देशातील राजकीय पुढारी, लोक प्रतिनिधी, नेताजी, आणि सत्ताधारी समाजातील लोकांना वेठीस धरुन मनी पावर, मसल पॉवर, सत्ता पावर,चा दुर उपयोग का करीत आहे. याचा अर्थ असा आहे की सरकार ची भुमिका हुकुमशाही ची आहे.

राजकीय आरक्षणाचा बळी ओबीसी समाज पडला हे राजकीय पुढारी यांच्या अलगर्जी पणा मुळे ह्याचा परिणाम राजकीय पक्षावर झाला नाही परंतु ओबीसी समाज राजकीय आरक्षण पासून वंचित ठेवण्याचे काम सर्व राजकीय पक्ष करत आहे हे मोठे ओबीसी आरक्षणाबाबत छडयंत्र आहे. अशा राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांना मतं मागण्या साठी काहीचं अधिकार नाही

आरक्षण हा SC, ST, OBC, घटकांतील लोकांचा एक आधार आहे, एक संधी आहे परंतु छडयंत्र वादी सत्ताधारी लोक प्रतिनिधी जातीनिहाय जनगणना,म्हणा किंवा इंम्परिकटल डाटा, पुर्ण करण्यासाठी पुढे येत नाही आणि “‘सत्तेच्या नशेत”‘ वर्षानुवर्षे झोपेत असतात मग या राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधी ची सत्तेच्या सभागृहात आवश्यकता काय? ही सत्ताधारी लोकप्रतिनिधी समाजातील लोकांचा विश्वासघात करत आहे.

सत्ताधारी सरकार, आणि विरोधी पक्षनेते यांनी निवडणूक आयोग आपल्या हातात घेणं हे असंवैधानिक आहे सत्ताधारी लोक प्रतिनिधी नी हे समजु नये की फक्त सरकारच आहे या देशात न्यायालय पण आहे आता सरकारने आणि विरोधी पक्षनेत्या नी एकमेकांवर चिखलफेक करु नका , सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करा आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीला सामोरं जा आता एक मेकाची खिपलं काढतं बसु नये असे वक्तव्य सामाजिक कार्यकर्ते मा.मधुसुदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य यांनी व्यक्त केले आहे.