राळेगाव येथील देशी दारू दुकानाची परवानगी रद्द करा,महिलांनी दिले दुसऱ्यांदा निवेदन

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

    

राळेगाव शहरात नियमबाह्य पद्धतीने देशी दारूचे दुकान सुरु करण्याचे प्रयत्न सुरु आहे. या बाबत माहिती होताच 2मार्च 2022 रोजी चुकीचे व खोटे नाहरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे असे निवेदन महिलांनी दिले होते. मात्र कारवाई झाली नाही. करीता तत्कालीन मुख्याधिकारी यांनी दिलेले नाहरकत प्रमाणपत्र रद्द करावे असे निवेदन आज जिल्हाधिकारी यवतमाळ तथा मुख्याधिकारी न . प. राळेगाव यांना देण्यात आले.
नगरपंचायत राळेगाव हद्दीतील मनीष वाघमारे यांचे जागेत वॉर्ड क्र. 6 सर्वे न. 600 येथे मुंबई येथील परवाना धारक उषा रेड्डी यांना या आधीच्या मुख्याधिकारी यांनी देशी दारूचे दुकान लावण्यासाठी दिनांक 9सप्टेंबर 2021रोजी बेकायदेशीरपणे तरतुदीचे उल्लंघन करून नाहरकत प्रमाणपत्र दिले. विशेष म्हणजे दी. 30 नोव्हेंबर 2013 रोजी तत्कालीन ग्रा. प. ने ठराव क्र. 8 नुसार भविष्यात देशी दारूचे दुकान लावण्यास परवानगी दिली जाणार नाही असा ठराव घेतला त्या कडे साफ दुर्लक्ष करण्यात आले. यात मोठा आर्थिक देवाणघेवाण होऊन तर हे नाहरकत प्रकरण करण्यात आले नाही ना. अशी शन्का घेण्यास वाव असल्याचा आरोप निवेदन कर्त्यांनी केला. निवासी जिल्हाधिकारी ललित कुमार वराडे व नगर परिषद यवतमाळ मुख्याधिकारी तसेच नगरपंचायत राळेगाव येथील मुख्याधिकारी माधुरीताई मडावी यांना निवेदन देण्यात आले .सदर निवेदन देण्या करिता नगरसेवक रालेगाव बाळुभाऊ धुमाळ,प्राध्यापक सरिकाताई ताजणे महिला जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मनीषा काटे स्वामिनी जिल्हा दारूबंदी अभियान, यवतमाळ जिल्हा संघटक नशाबंदी मंडळ महा.राज्य.अड.रोशनी वानोडे, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस चारुशीला जगताप शहराध्यक्ष राष्ट्रवादी युवती काँग्रेस यवतमाळ, सौ प्रणाली ताई धुमाळ सामाजिक कार्यकर्त्या, आकाश कुरसंगे, प्रतिभाताई खुडसंगे, सविता दिनेश तोटे, नंदा घोटे,संगीता दत्ताजी चांदोरे, शितल कन्नाके आदि सह महिला नागरिक उपस्थित होते.