
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील रिधोरा परिसरात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने या परिसरातील शेतकऱ्यांत मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सविस्तर वृत्त असे रिधोरा शेतशिवारात शेती उपयोगी लागणाऱ्या वस्तूंची अज्ञात चोरट्यांनी चोरी करण्याचा सपाटा सुरू केल्याने या परिसरात शेतकऱ्यांन मध्ये मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी उगे यांच्या शेतातून पाणी देण्याची मोटर नाल्यावरून चोरीला गेली होती तर शंकर लोनबले यांच्या शेतातून 3 पोते तुर चोरीला गेली होती तर रामेश्वर कोकाटे यांच्या शेतातून एक लाख रुपयांचे रोटावेटर चोरीला गेले होते तर विनोद पेटकुले यांच्या शेतातून वखराचे जु चोरीला गेले होते तर लिलाराम लेनगुरे यांच्या शेतातून आऊत इश्रा चोरीला गेला होता. सदर या गोष्टीला एक ते दोन महिने पुर्ण होताच पुन्हा एकदा चोरट्यांनी आपले डोके वर काढले आहेत सदर वाढोणा बाजार ते रिधोरा रोड लगत असलेले शेतकरी वसंतराव वाढगुरे यांच्या शेतातून ६ जुलैच्या मध्य रात्री पाणी देण्याचे इंजिन तर साहेबराव कडु यांच्याही शेतातून पाणी देण्याचे इंजिन अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले आहे.सदर रिधोरा परिसरात लोहा लोखंड म्हणजे भंगार वीकत घेणाऱ्यांनी सुध्दा चांगलाच धुमाकूळ घातला आहे. सदर ग्रामीण भागात गावोगावी जाऊन भंगार विकत घेण्यासाठी यांना कुणी परवानगी दिली ? भंगार विकत घेण्याच्या नावाखाली दिवस भर सर्वे करून रात्री चोऱ्या तर करत नाही ना? असेही या परिसरात शेतकऱ्यात बोलल्या जात आहे.सदर या प्रकरणात वडकी पोलिसांनी गांभीर्याने लक्ष देऊन अज्ञात चोरट्यांना लगाम लावावे असे या परिसरातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
