
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील वडकी ते वडगांव रस्त्यावर खड्डयाचे साम्राज्य पसरून या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम तत्काळ करण्यात यावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कळंब उपविभागीय अभियंता यांना निवेदन देवुन रस्त्याचे काम न झाल्यास आंदोलन करण्याचा ईशारा मनसे तालुकाध्यक्ष शंकरभाऊ वरघट यांनी दिला. यावेळी मनसे तालुका शैलेशभाऊ आडे, गिरीशजी कुंभारकर, अक्षयजी खडसे उपस्थित होते.
