
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
तहसील कार्यलयाअंतर्गत असलेले मुद्रांक विक्रेते तसेच अर्जनविस यांचे कडून जादा दराने स्टॅम्प व कोर्ट फी स्टॅम्प ची विक्री करण्यात येत असून अशा स्टॅम्प विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी व त्यांचा स्टॅम्प विक्रेता परवाना रद्द करावा अश्या आशयाचे निवेदन राळेगांव वकील संघाच्या वतीने दिं २८ जानेवारी २०२२ रोजी तहसीलदार राळेगांव यांना देण्यात आले.
स्टॅम्प विक्रेते व अर्जनविस यांची दुकाने हे प्रशासकीय इमारती समोरील आहे . तालुक्यातील नागरिक तहसीलच्या तसेच न्यायालयीन कामकाजा करीता येत असतात न्यायलीयन किंवा तहसीलच्या व इतरही कामाकरिता स्टँप पेपरची तथा कोर्ट फी स्टॅम्पची आवश्यकता असते तेव्हा नागरिक स्टॅम्प विक्रते यांच्या कडून १०० स्टँप ११० ते १२० रुपयाने घ्यावा लागत असून १०० रुपयांचा स्टॅम्प हा १२० रुपयाने घ्यावा लागत असल्याने नागरिकांना २० रुपयांचा विनाकारणचा भुर्दंड सहन करावा लागत आहे .त्यामुळे स्टॅम्प विक्रते यांच्याकडून होणारी बेकायदेशीर लूट सुरू असून ही होणारी नागरिकांची लूट थांबविण्यात यावी व शहरातील सर्व मुद्रांक विक्रेत्यांची चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांचा परवाना रद्द करण्यात यावा असे या निवेदनातून नमूद करण्यात आले आहे.
तसेच मुद्रांक विक्रेते खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये दस्त लेखक म्हणून सही करतात ही बाब सुद्धा बेकायदेशीर आहे . वरील सर्व बाबीची चौकशी करून न्याय देण्यात यावा अशी मागणी आज दि २८ जानेवारी रोजी राळेगाव तालुका वकील संघाचे अध्यक्ष अँड प्रितेश वर्मा यांनी तहसीलदार व उपविभागीय अधिकारी राळेगाव यांचेकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे .
काही अर्जनवीस दुय्यम निब॔धक साहेबांच्या अगदी जवळ चे असून,कोठलाही काम त्वरित करुन देण्यात यांचा हातखंडा आहे. आणि यांच्यामुळे च मागील तत्कालीन अधिकारी अडचणीत येऊन निलंबित झाले होते .
