
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
शेतीच्या भरवशावरच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतातली माती जेव्हा चोरीला जाते तेव्हा त्या शेतकऱ्याचे जगणं मुश्कील होऊन बसते. शेत जमिनीची पोत त्या मातीवर आधारित असते कसदार असलेली मातीच शेतातून घेऊन गेल्यास त्याचा मोठा परिणाम पिकावर होतो. जेसीबी आणि ट्रॅक्टरचा माध्यमातून खोदून माती चोरून नेणार्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी गोविंदराव हळदे यांनी केली.
ढाणकी शेत शिवारातील खंड एक मध्ये सर्वे नंबर 170 /1/ब संतोष गोविंद हळदे यांची वडिलोपार्जित जमीन असून दरवर्षीच त्याची मशागत करून पेरण्यात येते. मिळालेल्या उत्पन्नातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे संतोष हळदे यांच्या शेतातील सुपीक माती शेजारी असलेल्या शेतकऱ्यांनी चोरून नेली. दिवसाढवळ्या शेतामध्ये जेसीबी व ट्रॅक्टरच्या माध्यमातून मातीचे खोदकाम करून शेजारीच असलेल्या शेतकऱ्याने आपल्या शेतात नेऊन माती टाकली. पाऊस पडला आणि शेतकरी शेतात पेरणीसाठी गेला असता ही बाब लक्षात येताच ं पोलीस स्टेशन गाठून त्यांनी तक्रार दिली. स्वतःच्या शेतीतील जेसीबीने खोदकाम करणारे व ट्रॅक्टर वाले याची आपल्या मोबाईल मध्ये फोटो घेत असताना जेसीबी व ट्रॅक्टर चालकाने हुज्जत बाजी केली याबाबतची तक्रार पोलीस विभाग व महसूल विभाग येथे देण्यात आली मातीत चोरून येणाऱ्या वर गुन्हे दाखल करण्याची मागणी या वेळेला संतोष हळदे व परिवार यांनी केली. शेतातील माती चोरून नेल्या कारणांनी आता शेतकऱ्यांना शेतात कोणतेही काम करता येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याची बाब आता समोर येत आहे.
