

ढाणकी – प्रतिनिधी:प्रवीण जोशी
ढाणकी नगरपंचायत प्रभाग क्र16 मधील रस्त्याची सलगच्या अतिवृष्टी दुरावस्था झाली असून या रस्त्यावर ये-जा करतांना नागरीकांना मोठी कसरत करावी लागत आहे.षहरातील प्रभाग क्र.16 सावळेष्वर रस्त्यालगत भागात नाथांजली इंण्डेण गॅस च्या कार्यालयाकडे जाणारा या रस्त्याचे सततच्या पावसाने प्रचंड हाल झाले आहे.पावसाळयाच्या तोंडावर या रस्त्याच्या मधोमध भागातून या प्रभागातील नगरसेवकांने पाणी पुरवठयाची वितरण नलीका पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी विस्तारीत केली.त्यावेळी जे.सी.बी च्या सहायाने खोदकाम केलेला हा रस्ता मोठया प्रमाणात काळी माती या रस्त्यावर पडली.अशातच मागील पंधरवाडयापासून अतिवृष्टीमुळे पावसाने ढाणकी परीसरात धुमाकुळ घातला आहे.त्यामुळे या रस्त्यावर चिखल व पाण्याचे साम्राज्य थाटले.
पावसाच्या पाण्याने रस्त्यावर जागोजागी मोठ मोठी खड्डे पडून खडयामध्ये गाळयुक्त पाणी साचले.या रस्त्यावर वाहन चालवीणे तर सोडाच नागरीकांना पायी चालतांनाही चंद्रावर चालण्याचा भास होतो.त्या प्रभागात प्लाॅटींग खरेदी करतांना ले आउट धारकाने त्या रस्त्याबाबात डांबरीकरणाचे आमीश दाखविले होते.मात्र मोठी वसाहत थाटली असतांना सुध्दा तिथे अजून चालण्यायोग्य रस्तेही उपलब्ध नाहीत.त्यातच नगरपंचायत चे लोकप्रतिनिधी म्हणून ज्या मतदार बांधवांनी ज्यांच्यावर विष्वास दाखवत निवडणूकीत मतदान केले त्यांच्याकडूनही प्रभागातील नागरीकांची रस्ता समस्या सुटली नाही हे विशेष.
इण्डेण गॅस च्या कार्यालयाशी शहरासह ग्रामीण भागातील नागरीकांचा मोठा संबंध येत असल्यामुळे या रस्त्यावर नेहमीच दुचाकी आणि चारचाकी वाहणाची रहदारी असते.आता मात्र या रस्त्यावरून दुचाकी आणि चारचाकी वाहणे चालवतांना अनेक नागरीकांना चिखलातून वाहन चालवितांना घसरून पडण्याची नौबत आली.नागरीकांची होणारी ससे होलपट पाहून त्या प्रभागात राहणारे योगेष पाटील यांनी पदरमोड करून त्या रस्त्यावर स्वखर्चाने 15 ते 20 ब्रास खडक टाकून रस्त्याची तात्पुरती डागडूग केली परंतू ती काही कायम स्वरूपी उपाययोजना नव्हे.या रस्त्याकडे या प्रभागातील नगरसेवकांने जातीने लक्ष देण्याची गरज आहे.अषी नागरीकांची दबक्या सुरात ओरड सुरू आहे.आरोग्य,पाणी,रस्ते,सांडपाणी,व्यवस्थापन,गटारी,नाल्या इत्यादी मुलभुत गरजा पुरविणे हि लोकप्रतिनीधीची नैतीक जबाबदारी असून नागरीकांचा तो मुलभुत हक्क आहे.मात्र प्रभाग क्र 16 मधील नागरीकांच्या नशिबी चिखलांचे रस्ते आले आहेत.
