

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
दत्तकृपा बहुउद्देशीय संस्था वडकी व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे (वर्धा) यांच्या संयुक्त विद्यमाने स्व.मोहित राजेंद्र झोटींग यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त वडकी येथे भव्य रोगनिदान, उपचार व रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक 13 ऑगस्ट रोजी स्मॉल वडंर कान्व्हेंट वडकी येथे करण्यात आले होते.
या शिबिराचे व कार्यक्रमाचे अध्यक्ष अँड वामनराव चटप माजी आमदार,उदघाटक राळेगावचे तहसीलदार डॉ.रविंद्र कानजडे होते तर प्रमूख पाहूणे म्हणून प्रचार्या मंजूषा सागर, सेवानीवृत्त मुख्याध्यापक गंभीरराव भोयर, प्रा.डॉ वाघ, अशोकराव पाटील, कीशोर झोटींग हे मंचावर उपस्थित होते.
याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात अँड चटप म्हणाले सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र झोटिंग यांचा मुलगा मोहित यांचे आजाराने कमी वयात निधन झाले.यामुळे झोटिंग परिवारावर आभाळ कोसळले तरी ते डगमगले नाही. मनाचा मोठेपणा दाखवून त्यांनी देहदान करण्याचे ठरविले.आजच्या काळात प्रत्येक जण स्वतःसाठी जीवन जगत आहे. कित्येकजण परंपरेच्या कार्यातच आपले जीवन जगत आहे कित्येकाच्या मनातून दान ही भावनाच लुप्त होत असल्याचे पहायला मिळत आहे. मोहितची डॉक्टर बनण्याची इच्छा होती. त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी झोटिंग परिवाराने मोक्ष या संकल्पनेत न गुरफटता देहदान श्रेष्ठदान म्हणून 18 वर्षीय मोहित रा. झोटिंग या मुलाचे मरणोपरांत कुटूंबीयाच्या सहमतीने आई -वडिलांनी देहदान करून देहदानापेक्षा कोणतेच दान श्रेष्ठ नाही हे दाखवून दिले. आपल्यावर आलेले संकट गोर गरीब व्यक्तीवर येऊ नये म्हणून स्व.मोहित स्मृतीदिना निमित्त दरवर्षी रोगनिदान, उपचार व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते आहे सांगितले.
या रक्तदान शिबिरात राजेश ढगे, गोपाल भोयर, प्रविण खेवले, भास्कर पाटील, त्र्यंबक केराम, सुरेश खडसे, दिलीप बांगरे, देवानंद सोनोने,शूभम जिवणे, साईनाथ आस्वले, डॉ पंकज टापरे, प्रविण महाजन, प्रशांत अहीरकर, मनोज जिकार,रुशब झोटींग, राहुल वडलवार, प्रकाश काटकर, घर्षण गमे,अजीज शेख,शंकर रारोरकार,दिनेश बोडे, मनोज चौके,अतूल भेदूरकर या २३ युवकांनी रक्तदान केले तर परीसरात नागरिकांवर मोफत उपचार करण्यात आले.शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रकाश चिव्हाणे, डॉ पंकज टापरे, प्रशांत अहीरकर, अतूल दांडेकर, राजेश भोयर, जिवन गोहकार, देवेंद्र झीले, प्रविण महाजन, संकेत मोरे, विठ्ठल खोंडे, गजानन कोल्हे, अशोकराव वाभीटकर, दादाजी डाहाळकर, स्मॉल वंडर कान्वेंट च्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे संचालन सतीश सावंत तर आभार प्रदर्शन शिवणकर सर यांनी मानले. यावेळी परीसरातील नागरीक मोठया प्रमाणात उपस्थित होते.
