
नाशिक मधील इगतपुरी तालुक्यात असलेल्या अनुसयात्मता मतिमंद निवासी विद्यालय येथील 4 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असून आणि या विषबाधेतून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे आणि दोन विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे विषबाधाचे कारण अद्याप समजले नसून अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अशाप्रकारे विषबाधा होना हे विद्यार्थ्यांसाठी अतिशय घातक आहे आणि निवासी विद्यालयांमध्ये आश्रम शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अन्नाकडे विशेष लक्ष पुरविणे गरजेचे आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील घटनास्थळी रवाना झाले आहेत तरी पुढील तपासात काय समोर येते हे पाहणे महत्वाचे आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात आणि नाशिक जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
