जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के?घुग्गुस येथे भूस्खलन ,अख्ख घर जमिनीखाली

घुग्गुस शहराच्या आमराई वॉर्डात एक धक्कादायक अशी घटना घडली एक घर पुर्णतः 80 ते 100 फूट जमीनीच्या खाली गेल्या ने बघ्यांची खूप मोठी गर्दी जमा झाली.आमराई वॉर्डातील गजू मडावी हे घरी असताना घरच्या आत एक छोटा खड्डा पडला त्यामुळे सर्व कुटुंबियांसह गजू मडावी हे घराबाहेर पडले.हळूहळू त्या खड्याचा आकार मोठा होत पूर्ण घर 80 ते 100 फूट जमीनीखाली गेले असे प्रत्यक्ष दर्शीनी सांगितले.
आमराई वॉर्डातील ही घटना वाऱ्यासारखी पसरली. पोलीस प्रशासनासह वेकोली चे अधिकारी तात्काळ घटनास्थळी हजर झाले .स्वतंत्र पूर्वी काळात या ठिकाणी inkline खाण होती असे सांगितले जाते तर त्या खाणीला स्वातंत्र्याच्या नंतर इथे open coal mines मध्ये रूपांतर करण्यात आले.घुग्गुस शहरतील नागरिकांनी या खाणीच्या जवळ घरे बांधण्यास सुरुवात झाली.हळूहळू पूर्ण खाणी च्या वर घुग्गुस वासीयांची वस्ती वसली.या घटनेच्या वेळी जमिनीचे कंपन होत होते त्यामुळे भूकंपाचे सौम्य धक्के पोहचले असावे असा प्राथमिक आहे. आमदार किशोर जोरगेवार हे घटनास्थळी येत पाहणी केली.अधिकाऱ्यांना सूचना केल्या.या वेळी नायब तहसिलदारखंडारे,मंडळ अधिकारी व पोलीस निरीक्षक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.


या भागातील वस्ती खाली करण्याचे आदेश दिले असून या भागातील सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.