विहीरगाव, चिखली गट ग्रामपंचायतच्या निकालाने गावचे चित्र बदलले

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील विहीरगाव, चिखली गट ग्रामपंचायतीच्या धक्कादायक निकालाने गावाचे चित्र बदलले आहेत. सविस्तर वृत्त असे थेट जनतेतून सरपंच पदाची निवड असल्याने अनेकांची हिरमोड झाली असल्याचे या वेळी दिसून आले आहे.सदर तालुक्यात सरपंच पद हे जनतेतून निवडण्यात आले आहेत या निवडणुकीत आगळे वेगळे महत्त्व होते अनेक ग्रामपंचायत वर संपूर्ण पॅनल एका गटाचे आले असले तरी सरपंच पद मात्र दुसऱ्या गटाकडे गेले आहे अनेक गावांत” गड आला पण सिंह गेला ” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तर अशीच परिस्थिती विहीरगाव , चिखली गट ग्रामपंचायत मध्ये तिहेरी लढत झाल्याने दिसून आली आहे भाजपा समर्थक पांडुरंग बेदुरकार यांच्या गटाचे चार सदस्य निवडून आले आहेत तर कॉंग्रेस समर्थक गटाचे दोन सदस्य निवडून आले आहेत तर परिवर्तन पॅनलचे सरपंच पदा सह दोन सदस्य निवडून आले आहेत. भाजपा समर्थक पांडुरंग भेदुरकार व कॉंग्रेस समर्थक महेश परचाके यांच्या जवळ बहुमत असुन सुद्धा सरपंच पदाला हातही लावू शकत नाही. कारण सरपंच पद हे जनतेतून निवडलेले आहे. सदर परिवर्तन पॅनलचे चरणदास साधुजी मेश्राम हे जनतेतून सरपंच म्हणून निवडून आले आहेत तर एक सदस्य म्हणून नरेश कोडापे हे निवडून आले आहेत. तर भाजपा समर्थक गटाचे पांडुरंग भेदुरकार यांचे गटाचे सदस्य म्हणून अरून हनुमान खंगारे, प्रतिभा प्रकाश खंगारे, वैशाली प्रभाकर खंगारे, विमल रामा चांदेकर तर कॉंग्रेस समर्थक गटाचे महेश परचाके यांच्या गटाचे सदस्य म्हणून स्मिता महेश परचाके,कपील दिलिप वगारहांडे हे निवडून आले आहेत तर गड गेला पण सिंह आला अशी परिस्थिती विहीरगाव, चिखली गट ग्रामपंचायत मध्ये दिसून आली आहे. सदर परिवर्तन पॅनलचे सरपंच पदा सह दोन उमेदवार निवडून आल्याने विहीरगाव, चिखली गावांचे चित्र बदलले असल्याचे दिसून येते आहे. सदर थेट जनतेतून सरपंच पदी निवड झाल्याने चरणदास साधुजी मेश्राम यांनी गावातील पी.पी. घुंगरे ,प्रकाश एम. सिडाम, जयराम सोयाम, हरिभाऊ शेंदरे, कृष्णाजी कुळसंगे, मनोहर मेटकर,मानिक खंगारे, रामदास मेटकर,चद्रभान मेटकर,चंदु येरणे,नथ्थु मडावी, अंबादास सीरबंदी,राजु मेश्राम, दादाराव कुळसंगे, वसंतराव कुळसंगे,अनुसया घुंगरे,लक्षमन सुतार, नानाजी सुतार, मधुकर सुतार यांचे आभार मानले आहे.