
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर
चार दशकाआधी यवतमाळ च्या मातीत मुहूर्तमेढ रोवलेल्या साप्ताहिक आत्मबल ने जिल्ह्यात एक वेगळी ओळख निर्माण केली. गेल्या सात वर्षांपासून राळेगाव येथून हे साप्ताहिक प्रसिद्ध होतं आहे. जनसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा वसा घेऊन सुरु असलेली वाटचाल उत्तरोत्तर अधिक दमदार होतं गेली. साप्ताहिक आत्मबल दिवाळी अंक -2022 प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने याची प्रचिती आली. दि.23 ऑक्टो.. रोजी कृ.उ. बा. स. शेतकरी भवन येथे हा प्रकाशन सोहळा आ. प्रा.डॉ. अशोक उईके यांचे अध्यक्षतेखाली माजी मंत्री प्रा. वसंत पुरके यांचे प्रमुख उपस्थितीत थाटात पार पडला. आय.बी. एन.लोकमत चे भास्कर मेहरे यांचे सहं सामाजिक, राजकीय, व्यावसायिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आवर्जून हजेरी लावल्याने हा प्रकाशन सोहळा अविस्मरणीय ठरला.
दोन माजी केबिनेट मंत्री, त्यातील एक विदयमांन आमदार, भास्कर मेहरे सारखे नावाजलेले पत्रकारं , ,कृ. उ. बा. स. सभापती ऍड. प्रफुल मानकर, भाजपा तालुकाध्यक्ष चित्तरंजन दादा कोल्हे,प. स. चे माजी सभापती प्रशांत तायडे, ओबीसीं सेल जिल्हाध्यक्ष अरविंद वाढोणकर, नगर पंचायत उपाध्यक्ष जानराव गिरी, माजी जि. प सदस्या उषाताई भोयर, ऍड. प्रफुल चौहाण, तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजेश काळे, ,राजु रोहणकर, राजेंद्र तेलंगे,शशिकांत धुमाळ, प्रदिप ठुणे, कुणाल भोयर,या सह सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी आवर्जून उपस्थित राहून प्रकाशन सोहळ्याची शोभा वाढवली.
अध्यक्षय मनोगतातून आ. प्रा. डॉ अशोक उईके यांनी स्व. विवेक राऊत हे माझे चांगले मित्र होते. माझ्या कठीण काळात ते माझ्या सोबत होते. त्यांच्या निधनानंतर मंगेश राऊत यांनी अत्यंत मेहनत घेत या वृत्तपत्राला नावारूपास आणले. असे मनोगत वेक्त केले. साप्ताहिक आत्मबल ने बातमी शी कधी तडजोड केली नाही. जे सत्य आहे ते निर्भीडपणे छापले आणि म्हणून या सोहळ्याला ही सर्व क्षेत्रातील मंडळी इथे आली आहे. हा विस्वास या साप्ताहिकाणे कमावला असे भाष्य केले. प्रा. वसंत पुरके यांनी विविधग उदाहरण|चा दाखला देतं खुमासदार शैलीत मनोगत वेक्त केले. पत्रकारिता हे एक व्रत आहे. बंडखोर अभिव्यक्ती ला देखील लोकशाही मध्ये अवकाश असला पाहिजे. आज तो भेटतो का ? याचे आत्मचिंतन करण्याची वेळ आल्याची भावना वेक्त केली. शेतकरी आंदोलन, बेरोजगारी यावर देखील त्यांनी प्रकाश टाकला. दर्जेदार बातमी उत्कृष्ट दिवाळी अंक हे साप्ताहिक आत्मबल चे वेगळेपण असल्याचे भाष्य त्यांनी केले. प्रसिद्ध पत्रकारं भाष्कर मेहरे यांनी मी साप्ताहिक आत्मबल नियमित वाचतो मला या साप्ताहिकातील बातमीचा दर्जा हा नेहमीच आवडत आला आहे. खरं सांगायचं तर यातून आम्ह्लाला देखील खूप काही शिकता येते हे वास्तव आहे. असे भाष्य केले. पत्रकारिता क्षेत्रातील संघर्षावर त्यांनी प्रकाश टाकला. ऍड. प्रफुल मानकर यांनी दिवाळी अंकाला शुभेच्छा देतं असतांनाच शेतकऱ्यांच्या विविध समश्याना वाचा फोडली. यांनी लोकशाही वेवस्था खरेच जनतेला न्याय देऊ शकते काय यांचा विचार करण्याची वेळ आल्याचे वक्तव्य करून एक मोठा प्रश्न वेवस्थसमोर उपस्थित केला.
तालुका पत्रकारं संगटनेचे अध्यक्ष राजेश काळे यांनी पत्रकारिता क्षेत्रासमोरील आव्हाने व शासनाची जबाबदारी यावर नेमके बोट ठेवले.
तालुका पत्रकारं संघटनेचे अध्यक्ष राजूभाऊ रोहणकर यांनी पत्रकारिता क्षेत्रात यायला किमान पात्रात ठरविण्याची वेळ आल्याचे सांगून उपस्थितांना अंतर्मुख केले.
स. 11:00 वा या प्रकाशन सोहळ्याला सुरुवात झाली. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या प्रकाशन सोहळ्याचे प्रास्तविक अशोकराव राऊत यांनी केले. दिवाळी अंकातील प्रभावशाली वेक्तीच्या मुलाखती उत्कृष्ट साहित्य, सुंदर मुखपृष्ठ याचे सर्वांनी कौतुक केले.
कार्यक्रमाचे खुमासदार संचलन व आभार मनिष काळे यांनी व्यक्त केले.
हशा अन टाळ्या
माजी मंत्री प्रा. वसंत पुरके आपल्या खास वक्तृत्वशैली साठी ओळखले जातात, आणि पुढे आ. प्रा. डॉ अशोक उईके असतील तर क्या कहने, मंग मी काय फोकमत सांगून राहिलो काय ? असा उल्लेख करून त्यांनी परत एकदा हजरजबाबी पणा व समयसूचकतेचा परिचय दिला. त्याचे झाले असे, पुरके सर एका संदर्भात बोलतांना म्हणाले सामना शिवसेनेचा, तरुण भारत भाजपा चा याला जोडून लगेच व्यासपीठावरून आवाज आला लोकमत काँग्रेस चा.. हा आवाज होता आ. प्रा. डॉ. अशोक उईके यांचा. आणि यावर सभागृहात एकच हशा पिकला. त्यावर क्षणभरदेखील विचलित न होता पुरके सरांच्या तोंडून उदगार निघाले.. थोडं थांबा मंग मी काय फोकमत सांगून राहिलो काय हे वाक्य त्यांनी अशा काही टोन मध्ये वापरले की आधीच खसखस पिकलेल्या सभागृहात हाश्याचा फवारा उडला. विशेष म्हणजे यात सर्वाधिक जोराने हास्य|चा आवाज जर कुणाचा आला असेल तर तो आ. प्रा. डॉ. अशोक उईके यांचा.
पुरके सर व उईके सर यांच्या मध्ये प्रफुलभाऊनी बरोबर अंतर ठेवले
दोन माजी मंत्री राजकीय दृष्ट्या विरोधक, त्यातच तालुक्यातील दिग्गज सहकार नेते ही मंडळी एकाचं व्यासपीठावर असण्याचा दुर्मिळ योग या प्रकाशन सोहळ्या निमित्ताने जुळून आला. या वेळी प्रा. पुरके सर व उईके सर यांच्या मधात ऍड. प्रफुल मानकर विराजमान होते. चाणाक्ष ऍड. प्रफुल चौहान यांनी हाच धागा पकडत टिप्पणी करण्याची संधी साधली. आज व्यासपीठावर दोन सरांमध्ये प्रफुलभाऊनी व्यवस्थित अंतर ठेवले आहे. भाऊंच टायमिंग पक्क आहे. असा टोला लगावला. त्यावर लगेच प्रा. वसंत पुरके व ऍड. प्रफुल मानकर यांनी तुमच्या कडच्या प्रफुलच्या टायमिंगकडे ही आमदारांच लक्ष आहे. असं म्हणताच पुन्हा एकदा हास्य|चा फवारा उडाला.
सा. आत्मबल च्या सोहळ्यात सर व मी राजकारण विसरून एकत्र येतो
पुरके सर व मी आम्ही राजकीय विरोधक असलो तरी, अनेक बाबतीत आम्ही राजकारण विसरून एकत्र येतं असतो. जेव्हा मतदार संघाच्या विकासाचा मुद्दा असेल अशा ठिकाणी राजकारण येऊ देतं नाही. शैक्षणिक दृष्ट्या सर मी त्या उंचीवर असल्याने आमच्यात ती पात्रता आहे. त्याच प्रमाणे साप्ताहिक आत्मबल च्या प्रकाशन सोहळ्यात देखील आम्ही याच भावनेने येतो. आपल्या मतदार संघातील जनतेला न्याय देण्याचे, जबाबदार पत्रकारिता करण्याचे कामं मंगेश राऊत व त्यांचे सहकारी करीत आहे. याचा आम्हाला दोघांनाही अभिमान आहे. हे वृत्तपत्र आम्ह्लाला आपलं वाटतं कारणं त्याच्या लिखाणाची शैली ती आहे. मी शेवट पर्यंत साप्ताहिक आत्मबल च्या कोणत्याही कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलं. या स्टेज वर कधीही राजकीय भाष्य होणार नाही. आम्ही एकमेकांबाबत मिस्कील टिपण्णी करु मात्र त्यात वैर, आकस नाही.खरं म्हणजे इथे सर्वांना एकत्र आणण्याची संधी हा सोहळा आपल्याला देतो याचा उल्लेख आवर्जून केला पाहिजे. पत्रकारिता क्षेत्रासमोर मोठे आव्हान आहेच. या ठिकाणी राजकर्ते म्हणून आम्ही पत्रकारांसाठी भरीव कामं करावं ही भावना अनेकांनी व्यक्त केली. मी त्या बाबत निश्चितच प्रयत्न करेन. असे मनोगत आ. प्रा. डॉ. अशोक उईके यांनी व्यक्त केले.
