
प्रतिनिधी: प्रवीण जोशी
ढाणकी
आजच्या परिस्थितीमध्ये कुठल्याही समाजाच्या विद्यार्थ्याला आपले ध्येय प्राप्त करायचा असेल ,समोर जायचा असेल, सर्वांगीण विकास साध्य करावयाचा असेल तर त्याला शिक्षण हेच मार्ग असल्याचे प्रतिपादन प्रख्यात साहित्यिक , कवी, प्रबोधनकार प्रो. डॉ .अनिल काळबांडे यांनी केले . ते येथील सानुबाई नाईक महिला महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त प्रमुख मार्गदर्शक व उद्घाटक म्हणून बोलत होते . या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रथम नगराध्यक्ष सुरेश जयस्वाल, प्रमुख अतिथी सभापती बाळासाहेब चंद्रे , पाटील अवधूतराव पाटील च द्रे पाटील केंद्रे ोमराव चंद्रे डॉ प्रदीप इंगोले, डॉ . डी एस पवार यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष शंकर राठोड, सुहासिनी राठोड या उपस्थित होत्या . सुरवातीला फित कापून कार्यक्रमाचे उद्घाटन व मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलीत करून कार्यक्रमाला सुरवात झाली .कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे अध्यक्ष शंकर राठोड यांनी करून, ढाणकी सारख्या दुर्गम परिसरामध्ये उच्च शिक्षणापासून वंचित असणाऱ्या मुलींना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी या महाविद्यालयाची स्थापना केल्याचे त्यांनी सांगितले .त्यानंतर डॉ .काळबांडे यांनी, आपल्या काव्यमय शैलीतून श्रोत्यांना मंत्रमुक्त करत बोलीभाषेत शिक्षणाचे महत्त्व सांगून कुठल्याही समाजाला आजच्या परिस्थितीत समोर जायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही यासाठी त्यांनी अनेक मान्यवरांचे शैक्षणिक दाखले देऊन शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगितले .या परिसरामध्ये शिक्षणाचे दालन खोलणारे शंकर राठोड व त्यांच्या पत्नी यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याचा वसा आणि वारसा जपल्याचे त्यांनी सांगितले . यावेळी सभापती बाळासाहेब चंद्रे यांनी , महाविद्यालयाच्या उभारणीत चंद्रे कुटुंबाचा कार्याचा उल्लेख करून या शैक्षणिक कार्यामध्ये आम्ही सर्व सहकार्य करणार असल्याचे सांगितले .कार्यक्रमाचे अध्यक्ष जयस्वाल यांनी ,या महाविद्यालयासाठी मुलींना पावसाळ्यात येण्या-जाण्याकरता नाल्यावरील फुलाची आवश्यकता आहे ते काम मी लवकरच पूर्ण करून शैक्षणिक दृष्ट्या कुठलीही अडचण असली तर त्यांना मदत करेल असे बोलले . त्यानंतर स्नेहसंमेलन तथा सांस्कृतिक कार्यक्रमास सुरुवात होऊन परिसरातील जवळपास पंधरा शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले . कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह चे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वामी विवेकानंद विद्यालयाचे उपाध्यक्ष प्रा.संतोष तिरकमदार यांनी केले त्यांना लक्षता मुळे यांनी सहकार्य केले तर आभार प्राध्यापक मनीष पवार यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा . आनंद श्रावणे , प्रा . कृष्णा पवार प्राध्यापक मुनेश्वर मॅडम , प्रा . नीता दवणे, राजू इंगळे , दूल्हे खान पठाण यांनी परिश्रम घेतले .
